Tushar Bhosale_Abdul Sattar 
महाराष्ट्र

Tushar Bhosle: "सत्तारांनी हिंदु धर्म स्वीकारलाए का? नसेल तर बाहेरुनच दर्शन घ्यायला हवं होतं"; भाजपच्या तुषार भोसलेंची मुक्ताफळं

Tushar Bhosle on Abdul Sattar: महाशिवरात्रीनिमित्त शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

Amit Ujagare

Tushar Bhosle on Abdul Sattar: महाशिवरात्रीनिमित्त शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावरुन वाद निर्माण झाला असून काही तरुणांनी संपूर्ण मंदिरचं गोमुत्र शिंपडून पवित्र केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणांच्या कृतीचं समर्थन भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी केलं असून "सत्तारांनी हिंदु धर्म स्वीकारलाए का? नसेल तर बाहेरुनच दर्शन घ्यायला हवं होतं" अशी मुक्ताफळंही उधळली आहेत.

नेमका प्रकार काय?

अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगरच्या रहिमाबाद इथल्या नागेश्वर मंदिरात जाऊन महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेतलं. पण सत्तार हे दररोज मांसाहार करुन घराबाहेर पडतात, त्यामुळं त्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नाही, असा दावा करत थेट मंदिर गोमुत्र शिंपडून पवित्र केलं. तरुणांनी मंदिर स्वच्छ केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तुषार भोसलेंची मुक्ताफळं

यावरच तुषार भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, अब्दुल्ल सत्तारांनी हिंदु धर्मात प्रवेश केला आहे का? नसेल तर मग त्यांनी बाहेरुनच दर्शन घ्यायला हवं होतं. आमच्या देवी-देवतांची मंदिरं ही काही स्मारकं नाहीत. गर्भगृहाचे काही धार्मिक नियम असतात. त्यामुळं राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका. जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर आधी हिंदु धर्मात प्रवेश करा मग खुशाल देवी-देवसांचे आशीर्वाद घ्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT