Dilip Walse Patil Meets Sharad Pawar  sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा नेत्याने घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

Dilip Walse Patil Meets Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेतली.

Roshan More

Sharad Pawar News : विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि सुनेत्रा पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आज ज्येष्ठ नेते, रeष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली आहे.

'साम टिव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. त्या संदर्भात दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. राज्यातील ज्वलंत कांदा प्रश्न, सहकार क्षेत्र व सहकारी संस्थांशी निगडीत विविध विषय, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातील वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

मागील अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे या भेटीचे वेगळे महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या भेटीत दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात चर्चा झाली की नाही याची अधिकृत माहिती समजू शकली नाही.

शेतकऱ्यांच्या प्रश्न गंभीर बनला आहे. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. शेतीचे प्रश्न तीव्र बनत असताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने शेती प्रश्न विषयी देखील त्यांच्या चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली की नाही याची माहिती समोर आली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT