MLC Election : वाद मिटवायला आलेले उदय सामंत नवा वाद निर्माण करून गेले! नरेंद्र दराडे 'डेंजर झोन'मध्ये?

MLC Election Nashik Gokul Geete Uday Samant : उदय सामंत यांची पाठ फिरतात बंडखोर गोकुळ गीते यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारावर तिखट शब्दात हल्ला केला. महायुतीने उमेदवारी देताना चूक केली आहे, असे ते म्हणाले.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Gokul Geete News: नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुती पुढे बंडखोरांचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिकला दौरा केला. हा दौरा उमेदवार नरेंद्र दराडे यांची अडचण करून गेल्याची चर्चा आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांना महायुतीतील बंडखोरी शमविण्यात यश आले नाही. शेवटी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आता गिरीश महाजन यांच्यावर विसंबला आहे. दरम्यान, गणेश गीते यांनी माघार घेतली आहे.

उदय सामंत यांनी बंडखोरांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार वगळता त्यांना कोणीही भेटले नाही. भाजप बंडखोर आणि प्रबळ उमेदवार गणेश गीते आणि गोकुळ गीते त्यांना भेटलेच नाही.

उदय सामंत यांची पाठ फिरतात बंडखोर गोकुळ गीते यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारावर तिखट शब्दात हल्ला केला. महायुतीने उमेदवारी देताना चूक केली आहे. उमेदवार चुकल्याने त्यांना त्याचा फटका बसेल, या शब्दात त्यांनी हल्ला केला.

नरेंद्र दराडे हे कोणत्याही परिस्थितीत उमेदवार होऊ शकत नाही. त्यांचा नाशिकच्या मतदार आणि जनतेच्या प्रश्नाबाबत काहीही संबंध नाही. माजी आमदार दराडे फक्त दराडे कुटुंबीय आणि त्यांची मातोश्री शिक्षण संस्था यांच्या पुरतेच मर्यादित आहेत.

गेल्या आठ वर्षात माजी आमदार दराडे यांचा जनतेशी कोणताही संपर्क नव्हता. स्वराज्य संस्था मतदारसंघात विविध नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी मतदार आहेत. निवडून आल्यावर यातील एकालाही ते भेटलेली नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत तीव्र नाराजी आहे, असे ते म्हणाले.

Uday Samant
Dombivli Politics : विधान परिषदेची धामधूम सुरू असतानाच शिंदेंनी डाव टाकला; भाजप नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

नरेंद्र दराडे निवडून आल्यावर त्यांना मिळालेला विकास निधी कुठे खर्च झाला हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. कोणत्याही नगरसेवक अथवा सदस्याला त्यांनी विकास निधी दिलेला नाही. कोणी त्यांच्याकडे जनतेच्या प्रश्नांसाठी गेल्यास ते कोणालाही उपयोगी पडलेले नाही.

नरेंद्र दराडे यांच्या विषयी मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. महायुतीचे अनेक मतदार आमच्या पाठीशी आहेत. शिवसेना तसेच एम आय एम आणि अन्य पक्षाचे सदस्य देखील आम्हाला संपर्क साधत आहेत. त्यांची सगळ्यांची मते आम्हाला मिळतील. त्यामुळे दराडे यांची कोंडी निश्चित आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घेणार नाही. माघार घेण्यासाठी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही असे स्पष्टीकरण गोकुळ गीते यांनी देत अंतर्गत नाराजीला मोकळी वाट करून दिली होती.

Uday Samant
Nashik MLC : नाशिकमध्ये भुजबळांच्या उमेदवाराला आसमान दाखवणाऱ्या शिवाजी सहानेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com