Nashik News, 04 Jun : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपचे बंडखोर गणेश गीते यांनी आघार घेणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने हे घडले.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत काल दिवसभर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी बंडखोरी शमविण्यासाठी मोठा निर्णय घेतला. दुसरीकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाशिकला भेट दिली.
या पार्श्वभूमीवर भाजपचे बंडखोर गणेश गीते यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत आहोत असे जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने हा निर्णय झाला. निवडणुकीपेक्षा वरिष्ठ नेत्यांचा आदेश मला अधिक महत्त्वाचा आहे, असे गीते म्हणाले.
महायुतीच्या दृष्टीने गणेश गीते यांची माघार एक महत्त्वाचा राजकीय निर्णय आहे. मात्र त्यात मोठी राजकीय खेळी लढली आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. गणेश गीते यांनी एक वर्षांपासून आपण या निवडणुकीची तयारी करत होतो. पक्षाच्या नेत्यांनी त्यासाठी शब्द दिला होता. मात्र नेत्यांनी सांगितल्यानेच आपण माघार घेत आहोत. शिवाय निवडणुकीपेक्षा पक्षाच्या नेत्यांचा आदेश सर्वोच्च आहे, असे ते म्हणाले.
गणेश गीते यांनी माघार घेतली आहे. मात्र त्याच वेळी गोकुळ गीते हे अपक्ष उमेदवार आणि त्यांचे बंधू निवडणुकीत कायम आहेत असे देखील स्पष्ट केले. त्यामुळे भाजपने नरेंद्र दराडे यांचा एक प्रश्न सोडवला आणि दुसरा कायम ठेवला आहे.
या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा यांनी देखील सूचक वक्तव्य केले आहे. बुधवारी मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांनी चर्चा केली. त्यावेळी दिवसभरात साडेचारशे हून अधिक नगरसेवक आणि मतदारांनी गीते यांच्याशी संपर्क केला होता. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने माघार घेतली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.