Aditya Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Aditya Thackeray : नारायण राणेंच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले 'घाण त्यांच्या...'

Aditya Thackeray Vs Narayan Rane : सालियन कुटुंबावर दबाव आणल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. ते म्हणाले, मुलगी गेल्यानंतर ते धक्क्यात होते. त्यांना पोलिसांनी, आरोग्य विभागाने सहकार्य केले नाही.

Roshan More

Aditya Thackeray News : भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला होता, असे म्हटले. तसेच उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये, अशी विनंती केल्याचे देखील नारायण राणे म्हणाले. त्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, 'माझं काम तेच आहे याचं उत्तर द्यायचं नाही. कारण यांना पगार मिळतो इतरांवर घाण आरोप करायचा. आपण आधीही पाहिलं असेल त्यांनी माझ्या परिवारावर, माझ्या वडिलांवर, माझ्य पक्षावर आरोप केले. पक्ष सोडल्यापासून ते आमच्यावर टीका करतात पण कचऱ्यावर आपण लक्ष देत नाही.'

मी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील रस्त्याच्या भ्रष्टाचाराविषयी बोललो होतो. आज मुंबईतील सर्व आमदार त्या विषयी बोलत आहेत. मी मुख्यमंत्र्यांना या विषयी पत्र लिहणार आहे.मी जो घोटाळा बाहेर काढला होता त्याची चर्चा आत्ता सुरू आहे, असे देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सालियान कुटुंबावर दबाव आणला...

सालियन कुटुंबावर दबाव आणल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. ते म्हणाले, मुलगी गेल्यानंतर ते धक्क्यात होते. त्यांना पोलिसांनी, आरोग्य विभागाने सहकार्य केले नाही. माजी महापौर पेडणेकर यांनी जाऊन सालियन कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्यावर दबाव आणाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT