Anganwadi Sevika: दुष्काळाच्या छायेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनानं दिवाळीपूर्वीच ५००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतनीसांसाठी दिवाळीसाठी भाऊबीज म्हणून प्रत्येकी २००० रुपये थेट खात्यात जमा केले जाणार आहे. यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे.
या निर्णयाबाबत सांगताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या घोषणाची काळजी ही अंगणवाडी सेविकांवर सोपवलेली असते. त्यांच्या मदतीला मदतनीस महिला देखील असतात. त्यांच्या दिवाळीचा सण गोड व्हावा यासाठी त्यांना ही मदत देण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात यापूर्वी पहिल्या टप्प्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याद्वारे आता एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या सर्व तालुक्यांना यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या सर्व १२ सवलती लागू होणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सरसकट फी माफीचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. तसंच शेतकऱ्यांकडं कर्जवसुलीसाठी तकादा न लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यासंदर्भात बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अग्रीम रोख रक्कम दिली जाणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ज्या ज्या भागात शेतकरी दुष्काळापासून होरपळलेला होता त्या भागांना १२ सवलती देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याचबरोबर दुष्काळाची परिस्थिती पाहता ऑक्टोबर महिन्यांतच जीआर काढून योजना जाहीर केल्या आहेत. तसंच तोंडावर आता दिवाळी आलेली आहे, शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अडचणीची आहे त्यासाठी त्यांना मदत देणार आहोत पण यांपैकी अग्रीम ५,००० रुपये दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा केले जातील असा निर्णय सरकारनं घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.