

Abhijeet Dipke: देशात सध्या परीक्षांचे पेपरफुटीची प्रकरणं, निवडणूक आयोगाचा कथित अनागोंदी कारभार, रोजगाराचा प्रश्न, महागाई अशा अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. तसंच या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांविरोधात पोलिसांकडून सुरुवातीला तीव्र लाठीचार्ज आणि आता धरपकडीचं धोरणं अवलंबल आहे. त्यातच आज कॉक्रोच जनता पार्टीचे दोन प्रमुख नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी कोर्टात हजर केलं आणि कोर्टानं त्यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावरुनच आता सीजेपीचे प्रमुख नेते अभिजीत दिपके यांनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. मोदींनी हिंमत दाखवून आता अधिकृत आणिबाणी जाहीरच करुन टाकावी, असं आव्हान थेट दिपकेंनी दिलं आहे.
अभिजीत दिपके म्हणाले, कॉक्रोच जनता पार्टी एक दबाव गट असून आणि कायम दबाव गट म्हणूनच काम करेल. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही इंडिया आघाडीच्या विरोधात आहोत. देशात जी सर्वकाही आंदोलन सुरु आहेत, ती एकाच मुख्य मुद्यासाठी आहेत. सीजेपीची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी प्रक्रिया सुरु असल्याच्या वृत्ताचा यावेळी दिपकेंनी इन्कार केला.
सीजेपीचे कार्यकर्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्लीच्या जंतर-मंतरजवळ आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यानं दोघांनाही ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरुन दिपके चांगलेच भडकले. त्यांनी मोदी सरकारवर कथितरित्या अघोषित आणिबाणी लागू केल्याचा आरोप केला. तसंच त्यांनी सवाल उपस्थित केला की, राष्ट्रध्वज फडकवाल्याप्रकरणी कार्यकर्त्यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवलं गेलं आहे. त्यामुळं जर तुम्हाला देशात आणिबाणी लागू करायची असेलच तर अधिकृतरित्या आणीबाणी जाहीर करा. जंतर-मंतरवर राष्ट्रध्वज फडकावणाऱ्या लोकांना पाच दिवस कोठडीत ठेवून तुम्ही अघोषित आणिबाणी का चालवत आहात? देशात राष्ट्रध्वज फडकावणं कधीपासून इतका मोठी गुन्हा झाला आहे.
दरम्यान, सीजेपीच्या आंदोलनावर कथित अर्बन नक्षलवादाचा प्रभाव असल्याचाही दिपकेंनी इन्कार केला. तसंच त्यांनी म्हटलं की, सरकारला कोणत्याही स्वरुपात चौकशी करु शकतं. पण कुठल्याही पुराव्याशिवाय असे आरोप करण्यात काय अर्थ आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.