Gokul Election 2026: गोकुळच्या निवडणुकीवर जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुखांचा वॉच; मतदान, मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Gokul Election News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी तयारी पूर्ण केली आहे. १८ ऑक्टोबरला ३५ केंद्रांवर मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.
Gokul Election
Gokul ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Election News: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमानुसार पार पडावी यावर प्रशासनाची भर आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहणार नाही, तसेच कोणावरही आरोप होणार नाहीत, याची प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. गोकुळची निवडणूक महत्त्वाची असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहून जबाबदारीने काम करावे, तसेच मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि कडेकोट बंदोबस्तात पार पाडावी, असे पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी सांगितले.

गोकुळ निवडणुकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रांवर एकूण ५ हजार ४१८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदान १८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणार आहे.

आजरा दोन केंद्रे व 305 मतदार, करवीर पाच केंद्रे व 865 मतदार, कागल चार केंद्रे व 619 मतदार, गगनबावडा एक केंद्र व 131 मतदार, गडहिंग्लज तीन केंद्रे व 399 मतदार, चंदगड तीन केंद्रे व 423 मतदार, पन्हाळा तीन केंद्रे व 513 मतदार, भुदरगड चार केंद्रे व 593 मतदार, राधानगरी चार केंद्रे व 699 मतदार, शाहुवाडी तीन केंद्रे व 440 मतदार, शिरोळ दोन केंद्रे व 270 मतदार आणि हातकणंगले एक केंद्र व 161 मतदार. मतदान केंद्र क्रमांक 29 राधानगरी येथे सर्वाधिक 182 मतदार, तर मतदान केंद्र क्रमांक 34 शिरोळ येथे सर्वांत कमी 129 मतदार आहेत.

Gokul Election
Kalyan Kale : केंद्र अन् राज्यातील सरकार जाऊन राहुल गांधी पंतप्रधान होणार; काँग्रेस खासदार कल्याण काळे यांचा दावा

मतदान प्रक्रियेसाठी 35 केंद्राध्यक्ष, 210 मतदान अधिकारी आणि 35 शिपाई नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय एक राखीव केंद्राध्यक्ष, 30 राखीव मतदान अधिकारी आणि पाच राखीव शिपायांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे 35 शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. मतदारांची ओळख निश्चित करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करावी, मतदान केंद्रांवर सतर्क राहावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे निर्देश देण्यात आले. निवडणुकीदरम्यान कोणतीही तक्रार किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास त्यावर नियमानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

मतदान प्रक्रियेसाठी एकूण 36 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मतदान केंद्रांसाठी 12, क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी 12 आणि पोलीस बंदोबस्तासाठी 12 वाहनांचा समावेश आहे. यासाठी 10 टेंपो व 26 तवेरा वाहने वापरण्यात येणार असून, दोन बस संघाकडून पुरविण्यात येणार आहेत. मतदान साहित्याचे वाटप व जमा करण्याची व्यवस्था शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमण मळा, कसबा बावडा येथे करण्यात आली आहे. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सात टेबलांवरून मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

Gokul Election
Gokul Election: विधानसभेचा राग गोकुळ निवडणुकीत काढला; भर स्टेजवर जनसुराज्यच्या नेत्याने राष्ट्रवादीचे पितळ पाडले उघडे

गोकुळच्या निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांच्या 9 ऑक्टोबर 2026 रोजीच्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजल्यापासून 18 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मतदान केंद्रांच्या ठिकाणी, तसेच 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी केंद्रावर लागू राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com