Maharashtra waiver Farmer sarkarnama
महाराष्ट्र

Farmers Diwali Relief : शेतकऱ्यांची दिवाळी गोड! १६४ कोटींची मदत बँक खात्यात जमा, फडणवीसांना शब्द पाळला!

Pune Farmers : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत देण्यात आली आहे.

Roshan More

Pune News : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या दिवाळी अग्रीम मदतीअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत १६४ कोटी २७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे ही मदत वितरित करण्यात आली आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची ग्वाही दिली होती.

त्यानुसार महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या यंत्रणांमार्फत मदत वितरणाची कार्यवाही करण्यात आली. ५ नोव्हेंबर २०२६ अखेर पुणे जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांना १६४ कोटी २७ लाख रुपयांची मदत वितरित झाली आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत थेट मदतीची रक्कम जमा करण्यावर शासनाने भर दिला आहे. या प्रक्रियेत महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळाला आहे.

'त्या' शेतकऱ्यांनाही मदत

काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते तपशीलातील त्रुटी किंवा अन्य कारणांमुळे मदतीची रक्कम जमा होण्यास विलंब झाला आहे. अशा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांनाही अग्रीम मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तांत्रिक अडचणींचे निराकरण झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्याही खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT