Farmers Protest: गोकुळचा वाद चिघळला! शासकीय संचालक निवडणीच्या विरोधात शेतकरी आक्रमक, शासनाचा पुतळा जाळला

Gokul Milk Union: गोकुळ दूध संघातील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात कसबा बावड्यात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सोमवारी २५ हजारांहून अधिक नागरिकांचा मोर्चा काढण्याचा आयोजकांचा दावा आहे.
Dairy Farmers Protest
Dairy Farmers ProtestSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Milk Union News: गोकुळच्या अध्यक्षपद निवडीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काढण्यात आलेल्या  5 शासकीय सदस्य नियुक्तीच्या अध्यादेशावरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयाविरोधात समविचारी आघाडी आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध पक्षांनी विरोध केला आहे मात्र या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनीच आक्रमक भूमिका घेत जोरदार एल्गार पुकारला आहे.

या निर्णयाच्या निषेधार्थ कसबा बावडा येथील भगवा चौकात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला.

या आंदोलनात कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील दूध उत्पादक शेतकरी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांचा निर्णय हा शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.

Dairy Farmers Protest
Gokul News: गोकुळ दूध संघात पुन्हा नवा ट्विस्ट! महायुतीचे संचालक 'समविचारी'च्या संचालकांविरोधात दाखल करणार यचिका

सोमवारी २५ हजारांचा धडक मोर्चा

या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना नेत्यांनी विश्वास व्यक्त केला की, "येत्या सोमवारी कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील २५ हजारांहून अधिक नागरिक व दूध उत्पादक शेतकरी एकवटून भव्य मोर्चा काढणार आहेत." या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला ठणकावून इशारा दिला जाणार आहे.

Dairy Farmers Protest
Devendra Fadnavis: मुश्रीफ, कोरे अन् सतेज पाटलांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, सरकार कोणाला पाठवणार नाही, अन्यथा मुख्यमंत्र्यांचा 'डीडीआर'चा दम

या वेळी बावड्यातील सर्व आजी-माजी नगरसेवक, श्रीराम सेवा संस्थेचे पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी तसेच कसबा बावडा व लाईन बाजार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे गोकुळच्या वर्तुळात आणि स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.