Devendra Fadnavis Dattatray Bharne  Sarkarnama
महाराष्ट्र

Dattatray Bharne News: २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ, ५० टक्के पंचनामे पूर्ण, 'कृषी' खात्याला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हवेत १९ हजार कोटी...

Drought in Maharashtra 2026 : राज्यात १४४ लाख ३६ हजार हेक्टरपर्यंत खरिपाचे क्षेत्र असून यंदा १४० लाख २६ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, राज्यातील अवघ्या ४२ तालुक्यांमध्येच १०० टक्के, तर १११ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. पावसाअभावी २६५ तालुक्यांमधील अंदाजे ९० लाख हेक्टरवरील पिके वाया गेली. सध्या दुष्काळाचे पंचनामे सुरू आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून आतापर्यंत ५० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. १५ ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण होतील. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत द्यायची आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने वित्त विभागाकडे १९ हजार कोटी रुपये मागितल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात १४४ लाख ३६ हजार हेक्टरपर्यंत खरिपाचे क्षेत्र असून यंदा १४० लाख २६ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, राज्यातील अवघ्या ४२ तालुक्यांमध्येच १०० टक्के, तर १११ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. पावसाअभावी २६५ तालुक्यांमधील अंदाजे ९० लाख हेक्टरवरील पिके वाया गेली. सध्या दुष्काळाचे पंचनामे सुरू आहेत.

राज्यातील दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी म्हणून राज्य शासनाने केंद्राला पत्र पाठविले होते. त्यानुसार पुढील आठ दिवसांत केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे. पथकांच्या पाहणीनंतर राज्य सरकारकडून केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठविला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या शासन निर्णयानुसार कोरडवाहू तथा जिरायती जमिनीवरील पिकांसाठी हेक्टरी ८,५०० रुपये, बागायती पिकांसाठी १७,००० तर बहुवार्षिक तथा फळपिकांसाठी हेक्टरी २२,५०० रुपयांची मदत मिळणार आहे.

'महिला शेतकरी' नोंदणीला प्रतिसाद

'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, २०२६' अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 'महिला शेतकरी प्रमाणपत्र' नोंदणीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरातून ३७ लाख ९३ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील योगदानाची अधिकृत ओळख, समान अधिकार आणि सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभमिळवून देण्याच्या उद्देशाने ही अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

प्राप्त अर्जापैकी राज्यातील ८९५ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन आतापर्यंत ६८ हजार ४३६ महिलांना शेतकरी प्रमाणपत्र वितरित केले आहे. ग्रामसभेच्या मंजुरीनंतर पुढील १५ दिवसांच्या आत पात्र महिलांना हे प्रमाणपत्र दिले जात आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यातील दुष्काळाने बाधित झालेल्या ५० ते ५५ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पुढील पाच-सहा दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, तशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निश्चितपणे दिवाळीपूर्वी मदत मिळेल. केंद्रीय पथक देखील चार दिवसांत पाहणी दौऱ्यावर येईल. त्यानंतर आपल्याला केंद्राकडूनही शेतकऱ्यांसाठी मदत मागता येणार असल्याचंही मंत्री भरणे यांनी सांगितलं.

'कृषी'ने मागितलेला निधी-

दुष्काळ मदतीसाठी

१४,००० कोटी

जलसंधारण व रोजगारासाठी

५,००० कोटी

एकूण निधी मागणी

१९,००० कोटी

अंदाजे बाधित क्षेत्र

२० लाख हेक्टर

हेक्टरी मदत (दोन हेक्टरपर्यंत)

८,५०० ते २२,५०० रुपये

दुष्काळ जाहीर केला; पण आदेश नाही

राज्यात जाहीर करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांव्यतिरिक्त महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या ४३ तालुक्यांचा शासन आदेश अद्याप काढण्यात आलेला नाही. तसेच उपसमितीच्या बैठकीत निश्चित केलेल्या १९ तालुक्यांचाही शासन आदेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या तालुक्यांत दुष्काळी उपाययोजना कशा पद्धतीने राबविण्यात येणार, याबाबत साशंकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT