Eknath Shinde announces “Ladki Soon Yojana,” to be implemented by Shiv Sena for women’s welfare in Maharashtra. sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Soon Yojana : 'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी सून', एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

Eknath Shinde Announces Ladki Soon Yojana : एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात लाडकी सून योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून महिलांचे रक्षण केले जाईल.

Roshan More

Eknath Shinde News : महाराष्ट्र विधानसभेच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करणाऱ्या या योजनेमुळे महायुतीला मोठा फायदा झाला. प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार पुन्हा आले. या योजनेचे पैसे बंद होणार,पात्र महिलांना वगळ्याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदा शब्द दिला की कधीही फिरवायचा नाही, असे म्हणत ही योजना सुरू राहणार असल्याचे जाहीर केले.

लाडकी बहीण योजना महिलांच्या पसंतीत उतर असतानाच 'लाडकी सून' ही योजना शिंदेंनी जाहीर केली. मात्र, ही योजना सरकारकडून नाही तर शिंदेंच्या शिवसेना पक्षाकडून राबवण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केले आहेत.

'महाराष्ट्रात आता इथून पुढे आमच्या लेकी-सुनांवर आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. कारण महाराष्ट्राच्या लेकी-सुना सुरक्षित, तर महाराष्ट्रही सुरक्षित राहील. प्रत्येक घरातली सून ही माझी आणि प्रत्येक शिवसैनिकाची लाडकी बहीण आहे. अशा लाडक्या बहिणींचा आणि सुनांचा छळ करणारी वृत्ती ही समाजासाठी कलंक आहे. अशी वृत्ती ठेचूनच काढली पाहिजे. त्यांना अद्दल घडवली पाहिजे. त्यामुळे सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल. त्यासाठी 'लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन' हे अभियान आपण हाती घेत आहोत.', असे शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे.

हेल्पलाईन क्रमांक जाहीर

यापुढे शिवसेनेच्या शाखा हे या लाडक्या सुनांचं हक्काचं माहेर असेल, हे साऱ्यांनीच लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या समस्त लाडक्या बहिणींनी, लाडक्या सुनांनी इथून पुढे कोणत्याची दबावाला बळी पडू नये. तुमच्यावरचा दबाव झुगारून टाका. लाडक्या सुनांच्या मदतीसाठी शिवसेनेने एक हेल्पलाइन सुरू केली आहे. हेल्पलाईन क्रमांक- ८८२८८६२२८८ / ८८२८८९२२८८

या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून कुणालाही न घाबरता माहिती द्या. तुमच्या एका फोननंतर शिवसेनेच्या रणरागिणी तुमच्या मदतीला नक्की येतील. कायदेशीर मदत लागली, तर तीही या अभियानाच्या माध्यमातून दिली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

लाडक्या सुनेचं रक्षण...

छळ करणाऱ्यांना आधी समजावून सांगितलं जाईल. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तर मग काय करायचं, ते आमच्या शिवसेनेच्या रणरागिणींना चांगलं माहीत आहे. नारीशक्तीला वंदन करून आज आपल्या सुना सुरक्षित राहतील हा संकल्प करू या. तसेच, 'लाडक्या सुनेचं रक्षण, हेच शिवसेनेचं वचन !' हे अभियान यशस्वी करूयात, असे आवाहन देखील शिंदेंनी केले आहे.

शासकीय योजना नाही

एकनाथ शिंदे यांनी लाडकी सून योजना जाहीर केली आहे. सूनांच्या रक्षणासाठी ती राबण्यात येणार असल्याचे म्हटले. मात्र,ही शासकीय योजना म्हणून राबणार का असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला असते ते म्हणाले, आत्ताच्या घडली अजून पर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही. नेहमी सरकार चांगल्या निर्णयाच्या बाबत सरकारत्मक असतं. कॅबिनेटची बैठक ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतली जाते आणि त्यामध्ये निर्णय घेतले जातात. तसा निर्णय घेतला तर तुम्हाला कळवला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT