Vice President News: राधाकृष्णन यांना उद्धव ठाकरे पाठिंबा देणार का? विजय वडेट्टीवार म्हणाले, "महाराष्ट्राच्या हितासाठी..."

NDA Vice President Candidate C.P. Radhakrishnan:राज्याची खुर्ची सांभाळताना राज्यपालांनी महाराष्ट्राच्या हितासाठी काही ठोस निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेतली असे कुठेच जाणवला नाही.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: उपराष्ट्रपतिपदासाठी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजप व मित्रपक्षांकडे असलेल्या बहुमतांच्या जोरावर ते निवडून येतील असा दावा केला जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नावाला पसंती दिली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. असे असले तरी महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी काही ठोस निर्णय घेतला नसल्याने उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देतील, असे मला वाटत नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

अद्याप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावर अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी आघाडीत मात्र अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे दिसून येते. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कुठल्या पक्षाने मतदान करायचे किंवा विरोधात जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल असताना आम्ही अनेकदा त्यांना भेटलो. अनेक गंभीर विषयावर चर्चा झाली.

राज्यात येणारे ड्रग्स, महिला अत्याचार, शेतकरी प्रश्न अशा अनेक विषयावर त्यांना भेटलो आहे. राज्याची खुर्ची सांभाळताना राज्यपालांनी महाराष्ट्राच्या हितासाठी काही ठोस निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेतली असे कुठेच जाणवला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देतील असे मला वाटत नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना वडेट्टीवार यांनी प्रफुल पटेल यांच्यावरही तोफ डागली. शरद पवार यांना भाजप बरोबर जायचे होते हे आज प्रफुल पटेल बोलत असले तरी पवार साहेबांचे मन वळवण्याचे त्यांचे मन वळवून वळवून ते थकले होते. याचे मीच नाही तर अनेकजण साक्षीदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल पटेल यांचे फार सख्य नव्हते. त्यांचे संबंध फार काही चांगले नव्हते. आम्ही सर्व एकत्रित आघाडीत असल्याने त्याची माहिती आहे. हे कोणी नाकारू शकत नाही.

Uddhav Thackeray
Gokul Dairy Election 2026: 'गोकुळ'चे दूध 'तापणार'; आतापासून 'उकळी' फुटण्यास सुरवात

प्रफुल पटेल यांचा भाजपात जाण्याचा आग्रह कशामुळे होता हे कुठेही लपून राहिलेले नाही. भारतातील शेंबड्या पोरालाही हे माहीत आहे. ज्या प्रकारचा घटनाक्रम आहे त्याच्यानुसार भाजपमध्ये जाणे त्यांना आवश्यक होते. ते पवार साहेब यांच्याकडे बोललेही असतील. मात्र ते फार मुरब्बी व हुशार आहेत. त्यांना निर्णय घ्यायचा नसतो ते बोलत नाहीत. एकटा जाऊन उपयोग नसल्याने ते अजितदादांकडे वळले , असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com