Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, माध्यमांशी बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदेंच्या या प्रकृतीबाबत अपडेट दिली होती.
त्यांनी सांगितले होते की, उपमुख्यमंत्री शिंदें यांना 3 दिवस तिथेच (रुग्णालयात) राहावे लागेल. त्यांचा काश्मीर दौराही रद्द करण्यात आला आहे. रुग्णालयात असेल तरी त्यांनी राज्यातील पावसाचा आढाव घेतला. त्यांच्या स्वभावात शांत बसणे नाही.
'एबीपी माझा' वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी आज रविवारी दिवसभर रुग्णालयातच थांबावे लागणार आहे. त्यांना मंगळावरी डिचार्ज मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या बाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
शिरसाट यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री गेले गेले 3-4 दिवस आजारी होते. सतत काम आणि झोपेचा अभाव हे त्याचे कारण आहे. त्यांना अशक्तपणा आणि ताप होता.
शिंदे यांना ताप असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अशक्तपणा देखील होता. त्यामुळे पक्षात शनिवारी होणार पक्षप्रवेश श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले. डाॅक्टरांच्या सल्लाने एकनाथ शिंदे यांच्यावर घरीच उपचार करण्यापेक्षा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कामाचा अतिताण आणि मागील काहीकाळापासून प्रचंड दगदगीचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत होता. विधीमंडाळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यात देखील सहभागी झाले होते. कामकाज सुरू असतानाच त्यांना ताप देखील आला होता, अशी माहिती आहे. त्यामुळेच डाॅक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला देत रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.