Eknath Shinde : ...म्हणून डॉक्टरांनी एकनाथ शिंदेंना विश्रांतीचा सल्ला दिलाय : शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचे केंद्रीय विस्ताराबाबतही भाष्य

Prakash Abitkar statement : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ‘ऑपरेशन टायगर’ची पुढील फेरी सुरूच राहणार असल्याचा दावा केला. आगामी काळात अनेक आमदार, खासदार, माजी मंत्री आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील, असे त्यांनी सांगितले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pandhrpur, 04 July : राज्यात एकनाथ शिंदे यांचा झंझावात इतका मोठा आहे की, आगामी काळात ‘ऑपरेशन टायगर’ झालेलेसुद्धा लोकांना कळणार नाही. ‘ऑपरेशन टायगर दोन’ची माहितीसुद्धा समजली नव्हती, त्यामुळे आगामी काळात आमदार, खासदार, माजी मंत्री, कार्यकर्ते असे सारेच शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज (ता. 04 जुलै) पंढरपुरात केला.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आबीटकर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार, एकनाथ शिंदेंचे आजारपण यावर भाष्य केले आहे.

मंत्री आबीटकर म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेच्या मंत्र्याचे नाव आहे. त्यामध्ये श्रीरंग बारणे यांचे नाव पुढे आहे, असे विचारले असता प्रत्येकाला न्याय देत असताना उपलब्धता पाहून उपमुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.

शिवसेनेचा केंद्रातील चेहरा हा राजकीय उपलब्धतेवर अवलंबून आहे. ऑपरेशन टायगर करत असताना आजी माजी आमदार, माजी मंत्री, हे राजकारण कुणाकडे सुरक्षित आहे. याचा विचार करूनच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

Eknath Shinde
Crop Insurance Scheme : सरकारने शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा मारली अन्यायकारक पीकविमा योजना!

उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी आंदोलनावर बोलताना अबिटकर यांनी, पलीकडे कोण काय करते, यापेक्षा आम्हाला आमची संघटना मजबूत करायची आहे आणि त्यावर, आम्ही लक्ष देऊन आहोत. त्यामुळे समोरचे त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यानुसार चालत आहेत. शिवसेना येत्या काळात पक्ष संघटनेसाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. धावपळीमुळे त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, शिंदे हे ऐकणारे नाहीत. त्यांना सध्या आरामाची गरज आहे, असेही आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी सांगितले.

Eknath Shinde
DCM Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांचे साधेपण : उपमुख्यमंत्र्याचा प्रोटोकॉल बाजूला ठेवत वारकऱ्यांच्या पंक्तीत बसून केले जेवण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बाबत शिंदे यांच्या प्रकृतीची माहिती आरोग्यमंत्री म्हणून आबीटकर यांनी पंढरपुरात दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com