Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त 'लोकमत' या ऑनलाईन वेबसाईटने दिले आहे. डाॅक्टर हे उपचार करत असून शिंदेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही काळापासून कामाचा अतिताण तसेच प्रचंड दगदगीचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत होता. विधीमंडाळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यात सहभागी झाले होते. कामकाज सुरू असतानाच त्यांना ताप देखील आला होता.
दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमुळे ठाण्यातील शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. नंतर रात्री २ वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
शुभांगी पाटील यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मोठा जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे शिवसेनेचे उपनेतेपद सोपविण्यात आले आहे. दरम्यान, शुभांगी पाटलांच्या पक्षप्रवेशाने नाशिक, जळगाव भागातील समीकरणे बदलणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.