Shivsena News : मुंबईत मध्यरात्री मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना धक्का देत बड्या नेत्याचा शिवसेनेत तडकाफडकी पक्ष प्रवेश, सोपवली मोठी जबाबदारी

Politcial News : शिवसेनेने ऑपरेशन टायगर राबवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदाराना फोडले. त्यामुळे दिल्लीदरबारी एकनाथ शिंदे यांचे वजन वाढले आहे.
Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याच्या राजकारणात गेल्या दहा दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसला आहे. शिवसेनेने ऑपरेशन टायगर राबवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदाराना फोडले. त्यामुळे दिल्लीदरबारी एकनाथ शिंदे यांचे वजन वाढले आहे. त्यानंतर चारच दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांना फोडत विधानपरिषदचे उपसभापतीपद एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री एका वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बड्या महिला नेत्याने मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या प्रवेशानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दहा दिवसापासून मोठ्या घडामोडी घडत असून ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास महिला नेत्या शुभांगी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाला. शेकडो कार्यकर्त्यांसह त्या मुंबईत आल्या आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Maharashtra Politics: मोठी बातमी: ज्याची भीती होती तेच घडलं; सचिन अहिर यांच्यानंतर महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार फुटला

ऑपरेशन टायगर अंतर्गत 6 खासदार आणि सचिन अहिर यांना आपल्या पक्षात घेतल्यावर शिवसेनेने (Shivsena) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या महिला नेत्या शुभांगी पाटील यांची शिवसेना उपनेते पदी निवड झाल्याचीही माहिती समोर आली आहे. ठाकरे गटातील आऊटगोईंग कायम असून पक्षाला पुन्हा मोठे भगदाड पडले आहे.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंकडून ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; सर्वात विश्वासू आमदाराला फोडले, थेट उपसभापती पदासाठी भरला अर्ज

उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या महिला नेत्या शुभांगी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आता नाशिक, जळगाव भागातील समीकरणे बदलणार आहेत. या प्रवेशानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे शिवसेनेचे उपनेतेपद सोपविण्यात आले आहे.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
MNS News: एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले, तिकडे राज ठाकरेंचा मनसेबाबत तडकाफडकी मोठा निर्णय

दरम्यान या पक्षप्रवेशानंतर शुभांगी पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मी १५ वर्ष, १०० ते १५० आंदोलन केले, ३५ हजार शिक्षक घेऊन अपक्ष लढले. उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले होते. मला शिक्षक पदवीधर म्हणून उमेदवारी मिळावी पण वेगळंच घडलं. मी सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मला उमेदवारी दिली नाही, असा आरोप शुभांगी पाटील यांनी यावेळी केला.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
MNS News: एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले, तिकडे राज ठाकरेंचा मनसेबाबत तडकाफडकी मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com