Eknath Shinde PM Narendra Modi Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदेंच्या मोदींसोबतच्या 'मेगा बैठकी'नंतर महाराष्ट्रात सर्वात मोठी घडामोड; बडा नेता अधिवेशन अर्धवट सोडून तातडीनं दिल्लीला रवाना

Shivsena Political News: महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं दिल्ली गाठली. त्यांच्या PM नरेंद्र मोदींसोबतच्या 'मेगा बैठकी'नंतर आता पुन्हा एक राज्याच्या राजकीय व शिवसेनेच्या गोटातील मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: महापालिका,नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये महायुती त्यातही भाजपचीच सरशी झाल्याचं दिसून आलं होतं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही या निवडणुकांमध्ये चांगलं यश खेचून आणलं होतं. यानंतर महायुती सरकारमध्ये शिवसेना आणि यानंतर महायुतीत सारंकाही आलबेल आहे, असं वाटत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील त्यांचं मूळ गाव दरे गाठलं होतं. यानंतर त्यांच्या महायुतीतील नाराजीच्या चर्चांना उधाण आलं होतं.

यानंतर त्यांच्या महायुतीतील नाराजीच्या चर्चांना उधाण आलं असतानाच एकनाथ शिंदेंनी सोमवारी अचानकच दिल्ली गाठली. यानंतर त्यांनी मंगळवारी (ता.17) पंतप्रधान मोदींसोबत सुमारे दीड ते दोन तास चर्चा केली.आता या भेटीनंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, सर्वात मोठी राजकीय अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं दिल्ली गाठली. त्यांच्या PM नरेंद्र मोदींसोबतच्या 'मेगा बैठकी'नंतर आता पुन्हा एक राज्याच्या राजकीय व शिवसेनेच्या गोटातील मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. शिंदेंच्या अगदी जवळचा विश्वासू आणि शिवसेनेचा बडा नेता अधिवेशन अर्धवट सोडून अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते उदय सामंत हे मंगळवारी (ता.17 मार्च) संध्याकाळी दिल्लीकडे रवाना झाले आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्यापाठीमागं महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे धक्के तर लपलेले नाहीत ना अशी चर्चा सुरू धरू लागली आहे. सामंत यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत कोणतंही भाष्य केलं नसलं,तरी शिंदेंपाठोपाठ त्यांची दिल्ली एन्ट्री ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच दोन दिवसांसाठी दिल्लीचा विशेष दौऱ्यात गेले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.तसेच त्यांनी पंतप्रधानांसोबत दीड तास सखोल चर्चा केली.

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्याविषयी म्हणाले, महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा झाली आणि ती अतिशय सकारात्मक होती. अधिवेशन सुरू असताना होणाऱ्या भेटी हे कामाचा एक भाग आहे आणि विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता ते कामावर लक्ष केंद्रित करतात. तसेच माझ्यासाठी महत्त्वाचे म्हणजे टीका कोण करतं आहे हे नाही, तर मी माझं काम कसं करतो हे आहे. आपण विरोधकांच्या टीकेला नेहमी कामातूनच उत्तर देतो असंही शिंदे यांनीन स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT