Operation Tiger News : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदेंचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फोडल्यानंतर ऑपरेशन टायर 2.0 यशस्वी झाल्याची चर्चा होती. आता, एकनाथ शिदेंचा 'वेट अँड वॉच 3.0' असा मजकूर असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर 3.0 राबवले जात असल्याची चर्चा आहे.
शिंदेंनी ठाकरेंचे खासदार फोडले त्यावेळीच शिंदेंच्या पक्षातील नेत्यांकडून ठाकरेंचे आमदार देखील आपल्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर ठाकरेंच्या नेत्यांकडून आमदार कोठही जाणार नाहीत, ते ठाकरेंसोबत असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, शिंदेंचा पोस्टरमुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायर अॅक्टीव्ह झाल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपला पक्ष आणखी मजबूत व्हावा आणि सत्तेतील आपला वाटा वाढावा म्हणून शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंचे आमदार फोडण्याची रणनीती आखली जाऊ शकते, अशी देखील चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंच्या फोटो असलेल्या बॅनरमध्ये वेट अँड वॉच असा सूचक इशराा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे फक्त ठाकरेंचा पक्षातील नेते फोडण्याची रणनीती आखत आहेत की महायुतीत मित्रपक्ष असलेल्या पक्षातील नेते देखील फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे वर्चस्व वाढावे म्हणून देखील शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांशी संपर्क साधला जात असल्याची चर्चा होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.