

Pune, 08 November : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा म्हणजे, विधानसभेच्या २०२९ च्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री होतील, असा दावा शिवसेना नेते तथा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे, त्यामुळे शिवसैनिकांचे डोळे दिल्लीकडे लागले आहेत.
रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर वरील उत्तर दिले आहे.
ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, असा जनतेच्या मनातील विचार आहे. दिल्लीवरून जी काही सूत्रं हलतील, त्याप्रमाणे ते होणार आहे. आम्हाला सर्वांनाही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतंय. पण अंतिम अधिकार हा दिल्लीला आहे.
दिल्लीवाल्यांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं. हे सर्व विधानसभेच्या २०२९ च्या निवडणुकीपूर्वी होईल, असं आम्हाला वाटतंय, असे सांगून भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक विधान केले आहे.
दरम्यान, महायुती शिवसेना मंत्री, पदाधिकारी कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे, अशी तक्रार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे काहींनी केली आहे, अशी माहिती तुमच्याकडे असली तरी तसं मला वाटत नाही. गळचेपी करून घेणारे शिवसैनिक नसतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं (एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार) राज्य पातळीवर योग्य ट्युनिंग जमत असेल तर खाली कार्यकर्त्यांच्या पातळीवर काही अडचण यायला नाही पाहिजे, असेही स्पष्टीकरण मंत्री गोगावले यांनी दिले.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भरत गोगावले म्हणाले, राजकारणात कधी काय घडेल, हे काहीच सांगू शकत नाही. राजकारणात सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल आणि दुपारचा सायंकाळी कुठे असेल, हे सांगता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.