Eknath Shinde appoints woman leader to key post Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Assembly News : ठाकरेंचा समाचार घेणाऱ्या एकनाथ शिंदेंचा नवा गेमप्लॅन? थेट 'त्या' बड्या नेत्याचं कौतुक केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या!

Monsoon Session News : मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यावर एकीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली होती. यावरुन शिंदेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

Sachin Waghmare

Mumbai News : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. यावेळी सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांकडून राज्य सरकारवर झालेल्या आरोपांचा त्यांच्या शब्दांत समाचार घेतला. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यावर एकीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली होती. यावरुन शिंदेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता त्यांनी जोरदार टीका केली. मात्र, दुसरीकडे शिंदे यांनी ठाकरेंच्या पक्षाच्या बड्या नेत्याच्या कामाचे कौतुक केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सभागृहात बोलताना शिंदे यांनी मुंबई, पुण्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी पूरपरिस्थितीत चांगले काम केले आहे. मुंबई-पुणे संपर्क तुटला असताना सर्वच जण नागरिकांना मदत करीत होते. मी हॉस्पिट्लमधून कामाचा आढावा घेत होता. त्यातही मिसिंग लिंकवरून विरोधकांनी अनेक आरोप केले आहेत. यावरुनही शिंदेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

मिसिंग लिंकवरुन टीका करणाऱ्या विरोधकांनी कमान कोसळली की रस्ता कोसळला, याची तरी खातरजमा करायला हवी होती, असा चिमटा शिंदे यांनी यावेळी काढला. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली होती. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) स्वीय सहाय्यक असलेल्या मिलिंद नार्वेकर यांचे मात्र जाहीर कौतुक केले. मिलिंद नार्वेकर यांनी मिसिंग लिंकबद्दल खरे बोलण्याची हिंमत दाखवली. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे एकनाथ शिंदे विधिमंडळात बोलताना म्हणाले.

विधिमंडळात बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या नवा गेमप्लॅनवरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना चांगलीच बुचकळ्यात पडली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका करणाऱ्या शिंदे यांनी त्यांचे स्वीय सहायक असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या कामाचे कौतुक केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यापूर्वीही दोन दिवसापूर्वीच सभागृहात येत असतानाच एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावरच समोर आलेल्या आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यांशी शेकहँड केले होते. त्याचे फोटो व्हायरलही झाले होते. त्या सर्व घटनाक्रमावर धुरळा बसण्याआधीच एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांचे भरसभागृहात कौतुक केले आहे. त्यामुळे शिंदे यांचा नवा गेमप्लॅन काय? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT