Jagdish Guptas Eknath Shinde  sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंचा रणनीती यशस्वी; दिलजमाई अन् गुप्तांची घरवापसी!

Shivsena Jagdish Guptas : एकनाथ शिंदे यांनी आपल्या दौऱ्यात शिवसेनेची साथ सोडणाऱ्या जगदीश गुप्ता यांची नाराजी दूर केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde News : भाजपमध्ये नाराज झालेल्या माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यांचा तिथे लवकरच भ्रमनिरास झाला. महापालिका निवडणुकीत त्यांनी शिंदे सेनेच्या सर्व पदांचा त्याग करीत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत बंड पुकारले.

बुधवारी (7 जानेवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढत दिलजमाई घडवून आणली व ते पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. आता येथे ते पुन्हा किती दिवस रमतील, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेत दाखल होणाऱ्या जगदीश गुप्तांना महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपसोबतच्या युतीसंदर्भातील चर्चेत सातत्याने डावलण्यात येत होते. ती नाराजी त्यांनी वारंवार बोलूनही दाखविली, मात्र त्याची दखल न घेतल्या गेल्याने युती व जागावाटपाची चर्चा सुरू असलेली बैठक मधातच सोडून त्यांनी बहिर्गमन करीत जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त करतानाच आपण शिंदे सेनेला जय श्रीराम करीत असल्याचेही जाहीर केले.

यापुढे ज्या सहकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत मदत केले त्यांच्यासाठी काम करणार असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून ते शिवसेनेपासून अलिप्त होते. शिंदे बुधवारी अमरावतीला जाहीर सभेकरिता आले होते. सभेपूर्वी त्यांनी जगदीश गुप्ता यांची सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात भेट घेत एकांतात चर्चा केली. तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे त्यांची बंदद्वार ‘वन टू वन’ चर्चा झाली. यानंतर ते थेट एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाहीर सभेच्या व्यासपीठावरच दिसले.

जगदीश गुप्ता यांची नाराजी दूर करण्यात एकनाथ शिंदे यांना यश आल्याने जगदीश गुप्ता यांची शिवसेनेत पुन्हा वापसी झाली आहे. महापालिका निवडणुकीत त्यांचा शिवसेनेला किती लाभ होईल याचे उत्तर १६ जानेवारीला मिळणार आहे. यासोबतच ते सेनेत आणखी किती दिवस रमतील, हे सुद्धा आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT