BJP News: भाजप आमदाराचा 'उद्योग'; बावनकुळेंच्या डोक्याला ताप; दोन सभांमध्ये बंडखोर उमेदवारांचा धुडगूस

Municipal Corporation Election : प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेल्या यादीतून नावे वगळून आपल्या समर्थकांना एबी फॉर्म देण्यात आल्याच्या प्रकरणाची आग अद्याप शांत झालेली नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी दिवसभर चंद्रपुरात महानगरपालिकेतील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आले होते.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

BJP News : प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेल्या यादीतून नावे वगळून आपल्या समर्थकांना एबी फॉर्म देण्यात आल्याच्या प्रकरणाची आग अद्याप शांत झालेली नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी दिवसभर चंद्रपुरात महानगरपालिकेतील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आले होते. त्यांच्या सभास्थळी विविध ठिकाणी बंडखोरांनी निदर्शने आणि नारेबाजी केली. भाजपचे जवळपास 27 बंडखोर उमेदवार सध्या रिंगणात आहेत.

सपना टॉकीज परिसरात सकाळी जटपुरा प्रभागातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बावनकुळे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रभागात भाजपचे छबू वैरागडे, रवी लोणकर, प्रमोद क्षीरसागर तसेच शिवसेनेच्या भाग्यश्री हांडे रिंगणात आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे भाषण सुरू असतानाच याच प्रभागातून भाजपची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार राकेश बोमनवार यांनी थेट मंचावर धडक दिली.

अपक्ष उमेदवार मंचावर आल्याचे पाहून आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांना तेथेच अडवले. मात्र, बोमनवार यांनी बावनकुळे यांच्याशी बोलायचे असल्याचे सांगितले. त्यावर आमदार जोरगेवार यांनी बोमनवार यांचा हात पकडून त्यांना खाली उतरवले. दरम्यान, बावनकुळे यांचे भाषण सुरूच होते. बोमनवार यांनी भाषण सुरू असतानाच बोलायचे असल्याचा इशारा केल्याने बावनकुळे काहीसे गडबडले.

मात्र, त्यांनी बंडखोर उमेदवाराला ‘मंचाखाली उतरा, भाषण संपल्यानंतर बोलू’ असे सांगितले. त्यानंतर बंडखोर मंचाखाली उतरला आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी त्याला सभास्थळापासून दूर नेले. विशेष म्हणजे, याच बंडखोर उमेदवाराने भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने स्थानिक एन.डी. हॉटेल येथे पक्ष निरीक्षकांसमोर गोंधळ घातला होता. तसेच एका माजी महिला नगरसेविकेला शिवीगाळ करत उमेदवारी कापण्याचे खापर तिच्यावर फोडले होते.

Chandrashekhar Bawankule
Shivsena Vs BJP: 'साहेब, तुम्ही गप्पा मारून पुढे रवाना झालात, पण...'; छत्रपती संभाजीनगरच्या 'टॉक शो'वरुन दानवेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

एमईएल प्रभागात नारेबाजी

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुपारी इंदिरानगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभास्थळीही बंडखोरांनी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना उद्देशून ‘एबी फॉर्म चोर’ आणि ‘200 युनिट चोर’ अशा घोषणा दिल्या. एकीकडे बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानाच ही घोषणाबाजी सुरू झाल्याने सभास्थळी तणावाची स्थिती निर्माण झाली.

विशेष म्हणजे, या घोषणांमुळे निदर्शने टाळण्यासाठी बावनकुळे यांना सभास्थळी जाताना आणि परत निघताना वाहनाचा मार्ग बदलावा लागला. प्रदेशाध्यक्षांच्या यादीत नाव असतानाही पूजा पोतराजे यांची उमेदवारी डावलून दुसऱ्याला एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे पोतराजे तसेच भाजपचे धनराज कोवे यांनी या प्रभागात बंडखोरी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com