Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena News : मंत्री-आमदारांनंतर शिंदेंच्या रडारवर नगराध्यक्ष, नगरसेवक! कामाचा घेतला हिशेब : अभिनव उपक्रम राबविण्याची घोषणा

Shiv Sena municipal leaders meeting News : येत्या काळात राज्यातील शिवसेना मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी संघटनात्मक बदल करण्याचे ठरवले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सुरुवातीला शिवसेनेचे मंत्री व आमदार व खासदारांची बैठक बोलवली होती. त्यानंतर आता सोमवारी एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील शिवसेनेच्या नगराध्यक्ष, नगरसेवक यांची झाडाझडती घेतली. या बैठकीत नगरपालिकेतील नगराध्यक्ष व न नगरसेवकांच्या कामाचे ऑडिट करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी नगरसेवकांना तातडीने सूचना दिल्या. त्यासोबतच यावेळी राज्यातील शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या बैठकीप्रसंगी एकनाथ शिंदेंनी दिला कानमंत्र दिला आहे. त्यासोबतच येत्या काळात राज्यभरात 'नगराध्यक्ष आपल्या दारी' ही अभिनव उपक्रम राबविण्याची घोषणा त्यांनी केली.

या बैठकीप्रसंगी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी उपस्थित शिवसेनेच्या नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी काम करताना प्रशासनातील अडचणी सांगितल्या. त्यासोबतच यावेळी कमी बोला, जास्त काम करा असा कानमंत्र नगराध्यक्षांना दिला आहे. यावेळी नगरपालिकेतील नगराध्यक्षांसोबत विकास कामाबाबत चर्चा केली. त्यासोबतच येत्या काळात राज्यभरात 'नगराध्यक्ष आपल्या दारी' हा अभिनव उपक्रम राबविण्याची घोषणा त्यांनी केली.

यावेळी राज्यातील सर्व नगराध्यक्ष उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. येत्या काळात नगराध्यक्ष व नगरसेवक मिळून काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगरपालिकेतील नगराध्यक्षांसोबत विकास कामाबाबत चर्चा केली

पक्षाची धोरणं सक्षमपणे राबवण्याच्या सूचना

दरम्यान, येत्या काळात राज्यातील शिवसेना (shivsena) मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी संघटनात्मक बदल करण्याचे ठरवले आहे. महानगर पालिकेतील उपमहापौर, गटनेते व नगरसेवक यांची एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासोबतच नगरसेवकांच्या समस्याही एकनाथ शिंदे ऐकून घेणार आहेत. पक्षाची धोरणं सक्षमपणे राबवण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांच्याकडून नगरसेवकांना देण्यात आल्या असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT