Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti News : महायुतीच्या बैठकीत लोकसभेतील पराभवाचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले 'हे' कारण

Shivsena Politics News: महायुतीच्या तीन घटक पक्षाची नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये महायुतीमधील प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थित लोकसभेतील पराभवाचे कारण शोधण्यात आले.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण झालेला पराभव अजून काही केल्या पचनी पडत नाही. त्यामुळे या पराभवाचे कारण महायुतीकडून युद्धपातळीवर शोधले जात आहे. यासाठी महायुतीच्या तीन घटक पक्षाची नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थित लोकसभेतील पराभवाचे कारण शोधण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे मुख्यमंत्र्यांनी कारण सांगितले. पोलिंग बुथवर विरोधकांनी मतदानाच्या दिवशी त्यांच्या मतदारांना घराबाहेर काढले. त्यामुळे त्यांचे अधिक मतदान झाले. (Mahayuti News)

विरोधकांच्या 80 टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. आपले 60 टक्के मतदार जरी पोलिंग बूथवर गेले असते, तर 40 जागा सहज जिंकता आल्या असत्या, असे गणित मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यासमोर मांडले. आपण याठिकाणी कमी पडल्याचे स्पष्टपणे सांगितले.

त्यासोबतच विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यात महायुतीचे नेते कमी पडले. महायुतीमधील पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शिंदे यांनी लोकसभेतील पराभवाची कारणे सांगितली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना देशात चारशे पार जागा मिळणार असल्याचे गृहित धरुन महायुतीचा मतदार लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी साजरी करण्यासाठी गेला. त्यामुळे महायुतीला राज्यात कमी जागा मिळाल्या.

लोकसभेवेळी अब की बार 400 पारचा नारा देण्यात आला होता. त्यामुळे बरेचसे मतदार मतदानाच्या दिवशी सुट्टीवर गेले. त्याचा फटका बसला आणि लोकसभेत कमी जागा महायुतीला मिळाल्या, अशी मांडणी मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केली.

विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच

येत्या विधानसभा निवडणुकीत ही चूक टाळून काम करण्याची गरज आहे. त्यासोबतच येत्या काळात रणनीती बदल करण्याची गरज असल्याचे या पराभवातून स्पष्ट झाले असल्याचे शिंदेंनी सांगितले. त्यासोबतच आगामी कळत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नेत्यांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT