Rahul Gandhi : राहुल गांधींचं योगी आदित्यनाथ यांना पहिलं पत्र; म्हणाले, ...तर तुम्हाला सहकार्य करायला मी तयार!

Congress Yogi Adityanath Hathras Satsang Stampede : राहुल गांधी यांनी नुकतीच हाथरस येथील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे नातेवाईक तसेच जखमींची भेट घेतली होती.
Rahul Gandhi, Yogi Adityanath
Rahul Gandhi, Yogi AdityanathSarkarnama

New Delhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा पहिला दौरा केला. त्यानंतर लगेचच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. हे राहुल यांचे योगींना लिहिलेलं पहिलं पत्र आहे.

राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांचे कुटुंब तसेच जखमींच्या नातेवाईकांची भेट घेतली होती. या चेंगराचेंगरीत तब्बल 121 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भोलेबाबा या स्वयंघोषित गुरूकडून सत्सगांचे आयोजन केले होते.

राहुल गांधींच्या पत्रात काय?

हाथरस घटनेबाबत चिंता व्यक्त करत राहुल यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्रातून केली आहे. पीडित कुटुंबांसोबत राहण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या प्रकरणी तुम्हाला सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मीही तयार आहे, असेही राहुल यांनी पत्रात नमूद केले आहे.

Rahul Gandhi, Yogi Adityanath
Supriya Sule : ‘RSS’कडून सरकारवर 118 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; सुप्रिया सुळेंनी दाखवला आरसा

उत्तर प्रदेश सरकारने मृतांचे नातेवाईक व जखमींना दिलेली भरपाई खूप कमी आहे. भरपाईची रक्कम वाढवून ती लवकरात लवकर त्यांना द्यावी, अशी मागणी राहुल यांनी केली आहे. जखमींवर योग्यप्रकारे उपचार व्हावेत, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi, Yogi Adityanath
Video Rahul Gandhi : मोदी-शहांच्या गुजरातमध्ये जाऊन राहुल गांधींनी ठोकला शड्डू, म्हणाले, विधानसभेला...

दुर्घटनेला स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आणि संवेदनहीनता जबाबदार असल्याचे पीडितांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पारदर्शकपणे तपास व्हायला हवा. असे झाल्यास ते येणाऱ्या काळात अशा घटना रोखण्यासाठीचे एक महत्वाचे पाऊल असेल. तसेच पीडितांच्या कुटुंबियांना न्यायव्यवस्थेविषयी विश्वास वाढेल. दोषींवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे.        

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com