Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

MLC Candidate : मध्यरात्री खलबतं, एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेचा उमेदवार ठरला! मंत्रिपदही फिक्स, अख्खा पक्ष शिवसेनेत विलीन होणार!

Eknath Shinde Bacchu Kadu : विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत मध्यरात्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत कडू यांची उमेदवारी फिक्स झाल्याची माहिती आहे.

Roshan More

Bacchu Kadu News : विधान परिषदेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आज काँग्रेस काय भूमिका घेणार याची उत्सुकता असताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरलाचे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

एकनाथ शिंदेंनी उमेदवारीसाठी बच्चू कडू यांना त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत सामील करण्याची अट घातली होती. 'साम'च्या वृत्तानुसार बच्चू कडू यांनी ही अट मान्य केली आहे. त्यामुळे ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच शिंदेंनी कडू यांना पुढील सहा महिन्यात मंत्रिमंडळात घेण्याचा शब्द देखील दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचे मंत्रिपद फिक्स असल्याचे मानले जात आहे.

बच्चू कडू आपला प्रहार पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करणार आहेत. मात्र, त्यांची प्रहार ही सामाजिक संघटना स्वतंत्र काम करत राहणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या संघटनेच्या माध्यमातून बच्चू कडू हे आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहेत.

मध्यरात्री कडू-शिंदेंमध्ये खलबतं

बच्चू कडू एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील होतील. त्यांना विधान परिषदेच्या आमदारकीसोबत पुढील सहा महिन्यात मंत्रिपद देखील मिळणार आहे. या विषयी मध्यरात्रीउशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात खलबतं झाले असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT