

Mumbai News: राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे.महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत आता ट्विस्टवर ट्विस्ट येताना दिसत आहे.भाजपनंतर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदसाठी आपला उमेदवार दिला आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंचं नावावर जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण अचानक ठाकरेंनी माघार घेत मराठवाड्यातील फायरब्रँड नेते अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर केली. या त्यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेसमध्ये नाराजी असतानाच दुसरीकडे शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंचं स्टेटसही चर्चेचा विषय ठरत आहे.
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेतून ज्या काही नेत्यांची नावं होती, त्यात सुषमा अंधारेंचाही समावेश होता. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत होते. पण त्याचवेळी सुषमा अंधारेंनी शिवसेनेची बाजूच सावरली नाही,तर अनेक मोठमोठ्या प्रकरणांवरुन महायुती सरकारला घाम फोडणारी भूमिकाही मांडली होती. त्यामुळे ठाकरे अंधारेंच्या रुपानं नवा चेहरा विधान परिषदेला जाहीर करतील अशी चर्चा होती.
मात्र, उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी पु्न्हा एकदा आपला कौल अनुभवी अंबादास दानवेंच्या पारड्यात टाकला. यानंतर सुषमा अंधारेंनी ठेवलेलं व्हाटस् अप स्टेटसनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अंधारेंनी ठाकरेंसोबतचा व्हिडीओ स्टेटसला ठेवत "आमदारकी,खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान"असं म्हटलं आहे.
सुषमा अंधारेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमवेतचा व्हिडिओ शेअर करत, एका ओळीतच आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे.मात्र, ठाकरेंना राखी बांधतानाचा व्हिडिओ पोस्ट करताना एकप्रकारे त्यांच्याशी नातं आमदारकी,खासदारकीपेक्षा काहीपटीनं मोठं असल्याचंच या स्टेटसमधून दर्शवण्याचा प्रयत्न अंधारेंनी केला आहे.
विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी सुषमा अंधारे यांचं नाव चर्चेत होतं.पण यावर त्यांनी स्पष्टीकरण देताना विधान परिषदे उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि बातम्या मला अचंबित करणाऱ्या होत्या,असं सांगितलं होतं.पक्षशिस्त महत्त्वाची असून,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असेल,असेही अंधारे यांनी स्पष्ट केलं होतं.
सुषमा अंधारे यांनी मी 6 एप्रिलपासून रुग्णालयात (Global Hospital) दाखल होते आणि 12 एप्रिलला डिस्चार्ज मिळाल्यानंतर परळीत माझ्या गावी आहे.त्यामुळे मातोश्री किंवा सेना भवनात फिल्डिंग लावल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचा दावा केला होता. पण आता अंबादास दानवेंना उमेदवारी मिळाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.