Eknath Shinde Shivsena  sarkarnama
महाराष्ट्र

Shinde Shivsena Split : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत फूट पडणार? पक्षात तीन 'शिंदे' तयार, खासदाराच्या दाव्याने खळबळ!

Eknath Shinde Shiv Sena Latest Updates : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत तीन शिंदे तयार झाले आहेत. त्यातील दोघांना अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे ताकद देत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Roshan More

Sanjay Raut News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते अलबेल नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एक एकनाथ शिंदे होते. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेत तीन 'शिंदे' तयार झाले आहेत, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहेय.

राऊत म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा कोसळणार आहे, तसाच शिंदे गटही कोसळणार आहे.एकनाथ शिंदेंच्या पक्षात आता तीन शिंदे तयार झाले आहेत. आमच्याकडे एक एकनाथ शिंदे होता, आता शिंदे गटात तीन एकनाथ शिंदे तयार झाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, 'जे तीन शिंदे तयार झाले आहेत. त्यातील एकाला अमित शाह ताकद देत आहेत. तर, दुसऱ्याला देवेंद्र फडणवीस ताकद देत आहेत. त्यातील दोन शिंदे आम्हालाही मिळाले आहेत. हवा बदलत आहे, हे मी सांगतोय.दुःख व्यक्त करण्यासाठी काही खांदे लागतात. त्यांना आता पश्चात्ताप होत असेल.

राऊतांचा कोणाकडे इशारा?

संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेते तीन शिंदे तयार होत असल्याचे म्हटले आहे. ते तीन नेते कोण याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री उदय सामंत हे शिंदेंची शिवसेना फोडणार असल्याचा दावा मागे सुषमा अंधारे यांनी केला होता. तर, एक माजी खासदाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदेंच्या विरोधात ताकद देत असल्याच्या देखील चर्चा होत्या.

माजी आमदार संतोष टरफे शिंदेंच्या शिवसेनेत

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 'कळमनुरी'चे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश केला आहे. टारफे यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि अनेक पदाधिकारी देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT