Eknath shinde : एकनाथ शिंदेंची दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या नांदेडमधून मोठी घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार 5 हजार

Maharashtra government News : राज्यातील महायुती सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे लवकरच शेतकरी वर्गाला दुष्काळाचे जे लाभ आहे, नुकसान भरपाई आहे, बारा प्रकारचे देय आहेत, ते मिळणार आहेत.
Eknath Shinde Pune Teachers MLC Election
Eknath Shinde Pune Teachers MLC ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded News : राज्यातील जवळपास 304 तालुक्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या काळात या दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिवाळीसाठी अग्रिम म्हणून 5 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस कमी झाल्यामुळे शेतातील पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांची ही स्थिती पाहून सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. दिवाळीसाठी सरकारने अग्रिम पाच हजारांची मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही रक्कम कधी मिळणार याबाबत शेतकरी वर्गात उत्सुकता लागून राहिली आहे. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील महायुती सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे लवकरच शेतकरी वर्गाला दुष्काळाचे जे लाभ आहे, नुकसान भरपाई आहे, बारा प्रकारचे देय आहेत, ते मिळणार आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये, यासाठी सरकारने पाच हजाराची तातडीची मदत जाहीर केली आहे. साडेसात हजार कोटी रुपयाचे नियोजन सरकारने केलेले आहे. पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रक्रियेतून जात आहेत. त्यामुळे लवकर पैसे मिळतील, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळतील, असे नियोजन करण्यात आले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील ज्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यासर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार आहे. आमचे सरकार कुठेही हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. केंद्र सरकारदेखील महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे यावेळी शिंदे म्हणाले. पाच हजार रुपये हे तात्काळ मिळणार आहेत. विरोधी पक्ष काय म्हणतो पाच हजाराने काय होणार, पाच हजार रुपये हे तातडीचे आहेत. आणखीची मदत आहे ज्याप्रमाणे पंचनामे होतील त्यानंतर केली जाणार आहे.

Eknath Shinde Pune Teachers MLC Election
Drought Maharashtra: दुष्काळासाठी ३५ हजार कोटींचा प्रस्ताव! 'एनडीआरएफ'च्या निकषानुसार केंद्राकडे करणार मागणी

दरम्यान, शनिवारपासून राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम पाठवली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून सुरुवातीला हा निधी तहसील कार्यालयाकडे पाठवला जाणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीशी लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. याशिवाय, या मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची कपात करू नये, अशा सूचनाही सरकारकडून बँकांना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मिळणारी संपूर्ण ५ हजार रुपयांची रक्कम काढता येणार आहे.

Eknath Shinde Pune Teachers MLC Election
Dattatray Bharne News: २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ, ५० टक्के पंचनामे पूर्ण, 'कृषी' खात्याला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हवेत १९ हजार कोटी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.