Crime of Bribery Sarkarnama
महाराष्ट्र

Shinde Shivsena leader news: शिंदे गटाच्या बड्या नेत्याची अडचण वाढली; महिलेचा विनयभंग, दीड कोटी फसवणुकीचा गुन्हा

Maharashtra political scandal News : महिलेच्या कुटुंबीयाला पिस्तूल दाखवत ठार मारण्याची धमकी या नेत्यांनी दिल्याची तक्रार हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 39 वर्षीय महिलेने दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

Nagpur news : शिवसेना शिंदे गटाच्या विदर्भातील बड्या नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलिस व बड्या राजकारण्यांशी माझे संबंध आहेत. तुला कोणत्याही गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी देत एका महिला उद्योजिकेचा विनयभंग केला. त्यासोबतच दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या कुटुंबीयाला पिस्तूल दाखवत ठार मारण्याची धमकी या नेत्यांनी दिल्याची तक्रार हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ३९ वर्षीय महिलेने दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. या बड्या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मंगेश काशीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काशीकर हे शिवसेना शिंदे गटाचे विदर्भातील बडे नेते आहेत. 2022 मध्ये शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेना शिंदे गटासोबत काशिकर राहिले. काही आठवड्यांपूर्वीच त्यांची शिवसेना चंद्रपूर लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाली होती.बजाजनगर पोलिसांनी शिवसेनचे (शिंदे गट) संपर्क प्रमुख मंगेश विजय काशीकर (रा.शंकरनगर) यांच्याविरुद्ध महिला उद्योजिकेचा विनयभंग करून तिची दीड कोटीने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला हॉटेल व्यावसायिक आहे. डिसेंबर २०२३ मध्ये तिची मित्राच्या माध्यमातून काशीकर यांच्यासोबत ओळख झाली होती. बजानगरमधील भारत लॉनच्या मागे माझे हॉटेल आहे. ते बंद आहे. तुम्ही ते सुरू करा, असा प्रस्ताव काशीकर यांनी महिलेला दिला होता. तीन महिन्यांपर्यंत नफा किंवा नुकसान झाल्यास कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही. चवथ्या महिन्यापासून १० टक्के वाटा द्यावा लागेल, असे दोघांमध्ये ठरले होते.

त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर महिलेने प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर महिलेने कर्ज सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हॉटेलमध्ये सुधारणा केली. महिलेने हॉटेल सुरू केले. तिने काशीकर यांना लिखित करारनामा करण्यास सांगितले. काशीकर यांनी टाळाटाळ केली. महिलेला संशय आला. तिने चौकशी केली असता काशीकर यांच्या हॉटेलची जागा ही राहुल वर्मा नावाच्या व्यक्तीच्या नावे लीजवर असल्याचे तिला कळाले.

दरम्यान, महिलेने तीन महिन्यांपर्यंतचे काशीकर यांना दहा टक्क्याने पैसे दिले होते. त्यानंतर काशीकर यांनी महिलेसोबत वाद घालायला सुरुवात केली. हॉटेल बंद करण्याची धमकी दिली. महिला व तिच्याभावाने काशीकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता काशीकर यांनी तिला व तिच्या कुटुंबीयाला पिस्तूल दाखवत ठार मारण्याची धमकी दिली.

त्यासोबतच यावेळी पोलिस व बड्या राजकारण्यांशी माझे संबंध आहेत. तुला कोणत्याही गुन्ह्यात अडकवेल,असेही काशीकर म्हणाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी मंगेश काशीकर (रा.शंकरनगर) यांच्याविरुद्ध विनयभंग करून तिची दीड कोटीने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT