NCP symbol dispute : मोठी बातमी ! घड्याळ चिन्ह अन् राष्ट्रवादी दादांची की साहेबांची? कोर्टाचा निर्णय होणार 'या' तारखेला

NCP watch symbol case News : निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल अजित पवार यांच्या बाजूने दिला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षांच्या नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन वर्षांत दोन पक्षात उभी फूट पडली होती. सुरुवातीला एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली.

अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार गेले. त्यानंतर अजितदादांनी महायुती सरकारसोबत जुळवून घेत उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल अजित पवार यांच्या बाजूने दिला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षांच्या नेत्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर आता कोर्टात दीड वर्षांनी 14 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षात उभी फूट पडली होती. या फाटाफुटीनंतर, केंद्रीय निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारी 2024 रोजी अजित पवार यांच्या गटाला एनसीपी म्हणून मान्यता दिली आणि 'घड्याळ' हे चिन्ह त्यांना दिले. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Sharad Pawar, Ajit Pawar
Shivsena Conflict : मोठी बातमी! धनुष्यबाण, शिवसेना पक्ष ठाकरेंचा की शिंदेंचा? कोर्टाच्या निर्णयाची तारीख ठरली! तब्बल दीड वर्षानंतर सुनावणी

निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्याकडून असा युक्तिवाद करण्यात आला की पक्षाच्या मूळ स्थापनेशी निष्ठा असलेला गटच 'खरा' गट असतो, केवळ संख्या नव्हे, असे याचिकेत म्हटले होते. न्यायालयात अजूनही या वर सुनावणी सुरू आहे. गेल्या दीड वर्षांपासून या प्रकरणावर अंतिम निर्णय प्रतीक्षेत आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Jaykumar Gore case : गोरे बदनामी प्रकरणात नवा ट्विस्ट; रामराजे अन्‌ संबंधित महिलेच्या संभाषणाची क्लिप व्हायरल, धक्कादायक विधाने आली समोर

दोन वर्षांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावरसुद्धा अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून आयोगाच्या निर्णयास आव्हान देण्यात आले होते. कोर्टात दोन वर्षापूर्वी दाखल करण्यात आलेल्या शरद पवार गटाच्या याचिकेवर गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी झाली नव्हती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या तारखेला हे प्रकरण कोर्टासमोर लागले आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Imtiaz Jalil News : इम्तियाज जलील म्हणतात, 'पहले दिल्ली, फिर गल्ली'!

सध्यस्थितीत अजित पवार गट अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नावाने ओळखला जातो. त्यांच्याकडे सध्या घड्याळ हे चिन्ह आहे तर दुसरीकडे शरद पवार गट सध्या "शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" अशा नावाने कार्यरत असून सध्या 'तुतारी' हे चिन्ह वापरत आहेत.

Sharad Pawar, Ajit Pawar
NCP Politics : अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी जयंत पाटलांच्या शुभेच्छा, म्हणाले 'पाच वर्ष तरी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com