Eknath Shinde 3 Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : औरंगजेबाची कबर हटवण्याचा शिंदेंचा चंग; दिल्ली दरबारी होणार खलबत?

Eknath Shinde : औरंगजेबाची कबर हटवावी या मागणीसाठी आंदोलनं सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी, अशी भूमिका घेतली आहे.

Hrishikesh Nalagune

Tomb of Aurangzeb : राज्यात मागच्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेत आहे. ही कबर महाराष्ट्रात नसावी अशी हिंदुत्ववादी संघटनांची आणि नेत्यांची मागणी आहे. त्यामुळे कबर हटवावी या मागणीसाठी आंदोलनं सुरू आहेत. याच आंदोलनावेळी नागपूरमध्ये दंगलही उसळली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी, अशी भूमिका घेतली आहे.

त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) संरक्षित वास्तूच्या यादीत असल्याचे सांगितले. त्यामुळे नाईलाजाने कबरीचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही स्पष्ट केले. दरम्यान, आता कबर हटविण्याचा मुद्दा आता थेट दिल्ली दरबारी पोहोचणार असल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (18 मार्च) रात्री केंद्रिय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान ते या मुद्द्यांवर दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्याची शक्यता आहे. भारतीय पुरातत्व विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने कबर हटविण्याचा प्रश्नही केंद्राच्याच कोर्टात आहे. त्यामुळे शिंदे यांच्याकडून कबर हटवण्याची केली जाऊ शकते.

शिंदेही म्हणतात, महाराष्ट्रात 'कबर' हवी कशाला?

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवावी या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 मार्च रोजी पहिल्यांदाच भूमिका मांडली. औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे, अशी शिवभक्तांची मागणी आहे. माझीही हीच भावना आहे. औरंगजेब महाराष्ट्राचा दुष्मन होता, राष्ट्र द्रोही होता, त्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे. जे औरंगजेबाचे उदात्तीकरण करतात, त्यांना निषेध केला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका एकनाथ शिंदे घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT