
Nagpur Crime News: राज्याच्या उपराजधानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह प्रमुख नेत्यांचे होम टाऊन असणाऱ्या नागपूरमध्ये सोमवारी रात्री (ता.17) दंगल उसळळी. या दंगलीत ट्रॉलीभर दगड आणि हत्यारे वापरण्यात आले.
तर दहशत माजवत मजावाने पोलिसांसह ठराविक घरे आणि अस्थापनांना लक्ष केल्याचे स्पष्टीकरण फडणवीस यांनी विधीमंडळात दिले होते. तसेच त्यांनी या दंगलीत ज्यांचा हात आहे. ज्यांनी दगडफेक केली त्यांनी सोडणार नाही असेही म्हटले होते. यादरम्यान आता दंगलीतील महिला पोलिसाचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सोमवारी रात्री नागपुरच्या नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत मोठा हिंसाचार उसळा. यानंतर पोलिसांनी जमावाला पागवत त्यावर नियंत्रण मिळवले. सध्या येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून पुढील आदेश येऊ पर्यंत ती तशीच राहणार आहे. तर संचारबंदी लागू असलेल्या परीसरातील रस्ते बंद करण्यात आले असून शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान आता या दंगलीत बंदोबस्तावर असणाऱ्या एका महिला पोलिसाच्या वर्दीवरच जमावाने हात टाकल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता असून याचे पडसाद विधीमंडळात उमटण्याची शक्यता आहे.
नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडकडे झालेल्या राड्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अंधाराचा फायदा घेत जमावाने विनयभंग करण्याचा प्रयत्न केलाय. काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचे प्रयत्न केला. शिवीगाळ करण्यासह अश्लील शेरेबाजीही करण्यात आलीय. याविरोधात आता नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्थानकामध्ये जमावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशीच एक दुसरी लाजिरवाणी घटना देखील याच दंगलीवेळी घडली असून एका महिलेला मारहान करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. तर एका पोलीस अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीने वार देखील करण्यात आला आहे. दरम्यान आता दंगेखोरांची संरक्षण देण्याऱ्या पोलिसांवरत हल्ला करण्याची मजल कशी जाऊ शकते, असा सवाल उपस्थित केला जातोय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.