Eknath Shinde News : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल होणार असल्याची चर्चा आहे. तर, काही मंत्र्यांना थेट मंत्रिमंडळातून वगळले जाणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या चार मंत्र्यांची कामगिरी सुमार असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत.
या चार मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर, केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या काॅक्रोज जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणारे मंत्री संजय शिरसाट यांचे मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा आहे. या बाबत साम टिव्हीने वृत्त दिले आहे.
दीपकेंची भेट घेण्यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. भाजपमधून देखील संजय शिरसाट यांच्या या भेटीवर संताप व्यक्त केला जात होता. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील शिरसाटांनी भेट घेतल्याचे आवडले नसल्याचे समजते.
कॅबिनेटच्या बैठकीच्या आधी एकनाथ शिंदे दीपकेंच्या भेटीवरून संजय शिरसाट यांच्यावर कमालीचे नाराज झाले होते, असे 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
भाजप आमदार राम कदम म्हणाले की, मुळामध्ये हा संपूर्ण विषय वेगळ्या पद्धतीने पाहण्याची गरज आहे. राजकारणात कोणी कोणाचीही भेट घेऊ शकतं. पण दीपकेंनी ज्या पद्धतीनं युवकांना भ्रमीत करण्याचा प्रयत्न केला, अनेक गोष्टी चुकीच्या घडल्या. यामध्ये सत्ताधारी पक्षातील एका जबाबदार मंत्र्याने भेटून अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणं, हे काही योग्य नव्हतं.
शिरसाटांनी दीपकेंला भेटण्याच्या बाबतीत टायमिंग चुकीचे होते. दीपकेची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी योग्य नव्हती. त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलेली नाराजी रास्त आहे. ही भेट झाली ती योग्य नव्हती, असे भाजप नेत्यांनी देखील म्हटले आहे. मात्र, या भेटीवरून मंत्रिपद जाणार या बातम्यांना काही अर्थ नाही. संजय शिरसाट यांचे चांगलं काम आहे, असे देखील राम कदम यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.