Election Commission  Sarkarnama
महाराष्ट्र

Assembly Election update : महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीबाबत मोठी अपडेट; आयोगाकडून आजच होणार घोषणा?

Baramati by election news, Rahuri by election update : शिवाजीराव कर्डिले यांचे १७ ॲाक्टोबर २०२५ रोजी तर अजित पवार यांचे २८ जानेवारीला निधन झाले होते.

Rajanand More

Election commission india announcement : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रविवारी देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. त्यासोबतच आज आयोगाकडून महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांच्या तारखाही घोषित केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाच्या आजच्या घोषणेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाकडून आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यामध्ये पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. विधानसभा सदस्याच्या निधनानंतर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

शिवाजीराव कर्डिले यांचे १७ ॲाक्टोबर २०२५ रोजी तर अजित पवार यांचे २८ जानेवारीला निधन झाले होते. त्यामुळे आजच दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

पाच राज्यांत बिगुल वाजणार

देशातील पाच राज्यांमध्ये आज निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोग पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमध्ये दोन टप्प्यात आणि केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.

आसाम आणि पुद्दुचेरी वगळता अन्य तीन राज्यांमध्ये बिगर भाजपची सरकारे आहेत. बंगाल, तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजपने पुन्हा कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील काही दिवसांत पाचही राज्यांमध्ये सभा घेत यापूर्वीच निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तसेच पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांकडूनही ताकद लावली जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. आगामी निवडणुकीत इतिहास घडविण्यासाठी ममतादीदींनीही ताकद पणाला लावली आहे. तर तमिळनाडूत डीएमके-काँग्रेस आणि केरळमध्ये डाव्या पक्षांनी पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची ताकद नगण्य आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT