Bacchu Kadu & Navneet Rana Sarkarnama
महाराष्ट्र

Bacchu Kadu News : बच्चू कडूंच्या दाव्याने खळबळ; ...तर महायुतीमधून बाहेर पडणार !

Political News : काही जागावरून महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. विशेषतः अमरावती लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये नवनीत राणा व बच्चू कडू यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे.

Sachin Waghmare

Nanded News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ऐन उन्हाळ्यातच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

दुसरीकडे काही जागांवरून महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. विशेषतः अमरावती लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये नवनीत राणा व बच्चू कडू यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे.

खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात लढण्याचा निर्णय हा फक्त अमरावती मतदारसंघापुरता आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. अमरावतीमध्ये आमचे दोन आमदार आहेत. तेव्हा आमच्याशी चर्चा करायला हवी होती, पण ती तसदी कोणी दाखवली नाही. त्यामुळे आम्ही बुडालो तरी चालेल, पण स्वाभिमान गेला नाही पाहिजे, 'मर जायेंगे, कट जायेंगे लेकीन ताकद से लडेंगे' असे कडू म्हणाले. (Bacchu Kadu News)

त्यांना वाटत असेल तर आम्ही येत्या काळात महायुतीतून बाहेर जाऊ शकतो. मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले हे आम्ही कधीच विसरणार नाही. त्यामुळे त्यांचा फोन आल्यावर भेटायला गेलो होतो. भाजपला किंवा शिंदे यांना कुणाला वाटत असेल आम्ही युती धर्म पाळला नाही. त्यांना कारवाई करावी वाटत असेल तर करावी. त्यांची इच्छा नसेल तर युतीतून बाहेर जायला आम्हाला काही अडचण नाही, असेही कडू यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

त्यासोबतच येत्या काळात तुमच्याविरोधात जर काही कारवाई केली तर असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू म्हणाले की, कारवाई केल्यानंतर आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या काही दिवसांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये नवनीत राणा (Navneet Rana) व बच्चू कडू (Bacchu kadu)यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. त्यामुळे महायुतीमधील सर्वच घटक पक्ष समोरा-समोर आले आहेत. त्यामुळे येत्या काळात या वादावर कशा प्रकारे तोडगा काढला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

R

SCROLL FOR NEXT