Ram Satpute Vs Praniti Shinde : प्रणिती शिंदेंच्या भिडण्याच्या आव्हानाला राम सातपुतेंनी हात जोडले

Solapur Lok Sabha Constituency : लोकसभेची ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच होणार. मी कोणालाही भिडणार नाही. ते मोठे लोक आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे. विरोधक हे माजी मुख्यमंत्र्यांच्या परिवारातील आहेत, त्यामुळे मी त्यांना भिडणार नाही.
Ram Satpute-Praniti Shinde
Ram Satpute-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 March : विरोधक हे फार धनाढ्य आणि मोठे लोक आहेत. मी सामान्य परिवारातून आलेला छोटा कार्यकर्ता आहे. आम्हाला भिडायचं नाही, तर सोलापूरचा विकास करायचा आहे. मी त्यांना भिडू शकत नाही, असं म्हणत आमदार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या आव्हानावर हात जोडले.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात हिंमत असेल तर मला भिडा, माझ्या वडिलांवर काय बोलता?, असा सवाल प्रणिती शिंदे यांनी केला होता. त्यावर आमदार सातपुते यांनी उत्तर देणे टाळत हात जोडले.

आमदार सातपुते म्हणाले, लोकसभेची ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच होणार. मी कोणालाही भिडणार नाही. ते मोठे लोक आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे. विरोधक हे माजी मुख्यमंत्र्यांच्या परिवारातील आहेत, त्यामुळे मी त्यांना भिडणार नाही. पण, सोलापूरच्या युवकाला काम मिळालं पाहिजे, यासाठी मी जिवाचं रान करेल, प्रसंगी खासदारकी पणाला लावेन.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Satpute-Praniti Shinde
Mahavikas Aghadi Dispute : सोलापुरातही आघाडीत बिघाडी; 'सुशीलकुमार शिंदे शिवसेनेला मदत करतील, यावर विश्वास कसा ठेवायचा?'

लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सोलापूरच्या भविष्याची आहे. सोलापूरची जनता सुशीलकुमार शिंदेंना विचारत आहे की, संपूर्ण राजकीय कारकिर्दीत तुम्ही काय केले. मोदींनी काय केलं, याचा हिशाेब आम्ही देतो. तुमचं आडनाव शिंदे आहे; म्हणून तुम्हाला अनुकंपा तत्त्वावर तिकीट मिळाले आहे, असा टोलाही राम सातपुते यांनी लगावला.

शहर मध्यची जनता यांना कंटाळली

आमदार सातपुते (Ram Satpute) म्हणाले, ज्या मतदारसंघात प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आमदार आहेत, तिथूनदेखील भाजपला लीड आहे. 2014 मध्ये 48 हजार, तर 2019 च्या लोकसभेला 37 हजाराचे लीड प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपला मिळाले आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील जनताही यांना कंटाळली आहे.

सोलापूरचा हिंदू आमच्यासोबत

सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदे यांच्या मंदिर भेटीवरून राम सातपुते यांनी खोचक टीका केली. हिंदूंना दहशतवादी आणि भगवा आतंकवाद म्हणणं, हा यांचा खरा चेहरा आहे. भगवा दहशतवाद म्हणणारे हेच लोक आता भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या आमच्या संतांचे दर्शन घेत आहेत. पण, इथले हिंदू त्यांचा खरा चेहरा जाणून आहेत, त्यामुळे आगामी काळात इथला हिंदू पूर्णपणे ताकदीने आमच्या सोबत आहे, असा विश्वासही सातपुते यांनी व्यक्त केला.

Ram Satpute-Praniti Shinde
Sharad Pawar News : साताऱ्यातून लोकसभा लढण्यास शरद पवारांचा नकार; काय आहे कारण?

सातपुतेंचे उत्तर

सातपुते म्हणाले, आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू. सोलापूरच्या युवकाच्या हाताला काम भेटलं पाहिजे, आयटी पार्क झालं पाहिजे, उद्योग आले पाहिजेत, टेक्सटाईल पार्क झाले पाहिजेत. सोलापूरला जोडणारे 40 हजार कोटींचे रस्ते आमच्या सरकारच्या काळात झाले आहेत. काँग्रेसने मागच्या 70 वर्षांत काहीच दिलं नाही. त्यामुळं आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलूया. मी विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे, हेच माझं त्यांना उत्तर आहे.

आम्ही सोलापूरचा विकास केला

मी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचा आमदार आहे. मी विकासाच्या मुद्द्यावर बोलेन, ते मोठे आहेत. त्या भिडायचं म्हणत आहेत, मी अतिशय विनम्रतेने त्यांना सांगतो की,70 वर्षांत काँग्रेसने काय केलं आणि 10 वर्षांत भाजपने काय केलं, याचा आम्ही हिशाेब देतो. मागच्या 10 वर्षांत भाजपने सोलापूरचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे, असा दावाही सातपुते यांनी केला.

R

Ram Satpute-Praniti Shinde
Solapur Loksabha News : मराठा समाजाकडून सोलापूरसाठी जानकर, वाघमारे, व्हनकळसे चर्चेत; माढ्यासाठी २९ अर्ज

सातपुते नव्हे मोदी उमेदवार

सोलापुरातील काँग्रेसने जे काही केलं, त्याची तुलना आमच्या विकासकामांसोबत करावी. राम सातपुते इथे उमेदवार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत. त्यामुळे सोलापूरची जनता मोदींच्या विकास कामांवर विश्वास ठेऊन मतदान करतील. महायुतीचे सर्व घटक पक्ष भाजपसोबत ताकदीने उभे आहेत. कर्मठ कार्यकर्त्यांच्या जीवावर महायुती सोलापूरचा गड जास्त मताधिक्याने जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited By : Vijay Dudhale

Ram Satpute-Praniti Shinde
Praniti's Challenge to Satpute : प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना चॅलेंज; 'हिंमत असेल तर माझ्याशी भिडा...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com