Maharashtra Vidhansabha Election 2024 Sarkarnama
महाराष्ट्र

Vidhansabha Election Exit Poll : एक्झिटपोलनुसार महाराष्ट्रात महायुतीचंच पारडं जड; 'मविआ' बहुमतापासून लांबच!

Maharashtra exit polls: Mahayuti dominates, MVA trails in majority race: एक्झिट पोल्सची आकडेवारी समोर आल्यानंतर महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तर महाविकास आघाडीतील काही नेते मंडळींकडून आतापासूनच सत्ताधाऱ्यांवर टीका, टिप्पणी आणि आरोप सुरू झाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Vidhansabha Election 2024 Update: महाराष्ट्र विधानसभेसाठी आज(बुधवार) मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर लगेचच विविध एक्झिट पोल्सची आकडेवारी समोर आली. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार असल्याचं दिसत आहे. तर महाविकास आघाडी बहुमताच्या आकड्यापासून काहीशी लांब राहिल्याचे दिसून येत आहे.

एक्झिट पोल्सची आकडेवारी समोर आल्यानंतर महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तर महाविकास आघाडीतील काही नेते मंडळींकडून आतापासूनच सत्ताधाऱ्यांवर टीका, टिप्पणी आणि आरोप सुरू झाले आहेत.

तर अद्यापही काही विरोधी नेते एक्झिट पोल्सच्या आकडीवारीव विश्वास नसल्याचे सांगून, निकालाची प्रतीक्षा करणे उचित ठरेल असंही बोलत आहेत. याशिवाय महायुतीमधीलही नेते मंडळींनी एक्झिट पोल काहीही असो परंतु सरकार महायुतीचंच येणार असा दावा करत आहेत.

जाणून घेऊयात विविध एक्झिट पोल्सची आकडेवारी -

इलेकोट्ल एज - महायुती - १२१, मविआ- १५०, अपक्ष - २०

पोल डायरी - १२२-१७६, मविआ - ६९-१२१, इतर १२-१९

चाणक्य स्ट्रॅटजीस - महायुती -१५२-१६०, मविआ - १३०-१३८, इतर- ६-८

मॅट्रिझ - महायुती १५०-१७०, मविआ -११०-१३०, अन्य ८-१०

पीपल्स पल्स - महायुती १७५-१९५, मविआ-८५-१२, अपक्ष-७-१२

पी मार्क - महायुती १३७-१५७, मविआ- १२६-१४६ अपक्ष - २-८

विधानसभेच्या  288 जागांसाठी आज (ता. 20 नोव्हेंबर) राज्यात मोठ्या चुरशीने मतदान झाले आहे. मतमोजणी येत्या 23 तारखेला होणार असली तरी विविध संस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार मतदानोत्तर कलचाचण्यांचा अंदाज आज मतदान संपल्यानंतर जाहीर करण्यात आले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT