Chanakya Strategies Exit Poll : महायुती पुन्हा सत्तेत?, भाजप पुन्हा ठरणार सर्वांत मोठा पक्ष; ‘चाणक्य स्ट्रॅटेजीस’चा अंदाज

Maharashtra Assembly Election 2024 : ‘चाणक्य स्ट्रटेजीस’च्या कलचाचणीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे दर्शविण्यात आले आहे. त्यात महायुती ही 152 ते 160 जागा मिळवेल, असा अंदाज या चाचणीतून व्यक्त करण्यात आलेला आहे.
Chanakya Strategies Exit Poll
Chanakya Strategies Exit PollSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 20 November : चाणक्य स्ट्रॅटेजीसच्या मतदानोत्तर कलचाचणीत (एक्झिट पोल) महायुती तब्बल 152 ते160 जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. तसेच, भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनणार असल्याचे या अंदाज सांगण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीही 138 जागा जिंकून बहुमताजवळ पोचेल, असे या ‘पोल’मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

विधानसभेच्या (Assembly Election) 288 जागांसाठी आज (ता. 20 नोव्हेंबर) राज्यात मोठ्या चुरशीने मतदान झाले आहे. मतमोजणी येत्या 23 तारखेला होणार असली तरी विविध संस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार मतदानोत्तर कलचाचण्यांचा अंदाज आज मतदान संपल्यानंतर जाहीर करण्यात आले. त्यात चाणक्य स्ट्रटेजीस या संस्थेचाही कलचाचणी जाहीर करण्यात आली आहे.

‘चाणक्य स्ट्रटेजीस’च्या कलचाचणीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असे दर्शविण्यात आले आहे. त्यात महायुती ही 152 ते 160 जागा मिळवेल, असा अंदाज या चाचणीतून व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या विश्वास निकालापूर्वीच वाढला आहे.

भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरेल, असेही चाणक्यच्या सर्व्हेमध्ये म्हटलेले आहे. त्याखालोखाल काँग्रेस पक्ष जागा जिंकेल, असा दावा करण्यात आलेला आहे. मात्र, मतदारांचे कल असून प्रत्यक्ष निकाल नाहीत, हेही लक्षात ठेवावे लागणार आहे. प्रत्यक्ष निकालासाठी 23 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Chanakya Strategies Exit Poll
Solapur Voting Percentage : सोलापूर जिल्ह्यात दुपारी तीनपर्यंत 43.49 टक्के मतदान; थंडीची तीव्रता कमी होताच टक्का वाढला

दरम्यान, महायुतीमधील भारतीय जनता पक्ष सर्वाधिक 90 जागा जिंकेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही 48 जागा जिंकेल, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस 28 जागा जिंकेल, असा दावा चाणक्य स्ट्रॅटेजीसच्या सर्व्हेमध्ये करण्यात आलेला आहे. महायुती ही 152 ते 160 जागा जिंकेल, असेही या सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सर्वाधिक 63 जागा जिंकेल, असा दावा करण्यात आलेला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 40 जागांवर विजय मिळवेल, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा 35 जागांवर विजय खेचून आणेल, असेही चाणक्यच्या सर्व्हेत नमूद करण्यात आलेले आहे.

महाविकास आघाडी : 130 ते 138 जागा

महायुती : 152 ते 160 जागा

महायुती

भाजप : 90

शिवसेना : 48

राष्ट्रवादी : 28

Chanakya Strategies Exit Poll
Solapur Politic's : शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी; काडादींना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना नेता कडाडला

महाविकास आघाडी

काँग्रेस : 63

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : 40

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : 35

..................

अपक्ष व इतर : 06 ते 08

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com