Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील 25 शासकीय तांत्रिक विद्यालयांचं (शाळांचे) नामांतर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.तब्बल 25 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावं बदलण्यास सरकारनं मान्यता दिली आहे.या नव्या निर्णयानुसार आता विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या वैज्ञानिक,साहित्यिक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिकांची नावं या विद्यालयांना दिली जाणार आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बुधवारी(ता.21) या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR)जारी करण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामागं राज्यातील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण करणे, तांत्रिक कौशल्ये विकसित करणे आणि या क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान करणं हा असल्याचं समोर येत आहे.
राज्यात सध्या एकूण 162 शासकीय तांत्रिक विद्यालये कार्यरत असून,त्यापैकी पहिल्या टप्प्यात 25 शाळांचे नामांतर करण्यात आले आहे. कौशल्य विभागाच्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समितीला या नामांतराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार सुरुवातीला 25 विद्यालयांची पहिली यादी मंजूर करण्यात आली आहे.
सरकारच्या या नव्या निर्णयानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांतील 25 विद्यालयांचे नामांतर करण्यात आले आहे. या नामांतरात विज्ञान,शिक्षण, साहित्य, सामाजिक कार्य, उद्योग आणि स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
यात आता मुंबईतील प्रसिद्ध एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय आता प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक 'डॉ. जयंत नारळीकर शासकीय तांत्रिक विद्यालय' या नावाने ओळखले जाणार आहे. या नामांतरात विज्ञान,शिक्षण, साहित्य, सामाजिक कार्य, उद्योग आणि स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
१ मुंबई (धोबीतलाव)-डॉ. जयंत नारळीकर
२ मुंबई (दादर) - विश्वनाथ बेडेकर
३ मुंबई (विलेपार्ले)- मोहनलाल चौहान
४ ठाणे- माधवराव भिडे
५- बदलापूर - माधवराव ओक
६ मुरबाड - कृष्णा माळी
७ उल्हासनगर - धरमपाल गुप्ता
८ तलासरी - महादेव अंधेर गुरुजी
९ जव्हार - नवसु दादा वळवी
१० रत्नागिरी - डॉ. धनंजय कीर
११ राजापूर -वासुदेव जोशी
१२ महाड- सुरबानाना टिपणीस
१३ पेण- जनरल अरुणकुमार वैद्य
१४ रोहा- पांडुरंग शास्त्री आठवले
१५ शिरगाव, सिंधुदुर्ग- आप्पासाहेब गोगटे
१६ नाशिक- डॉ. बाळकृष्ण मुंजे
१७ अहिल्यानगर- अण्णासाहेब कदम
१८ धुळे- वैद्य प्र. ता. जोशी
१९ साक्री- नानासाहेब पाटील
२० नंदुरबार- बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता
२१ जळगाव- डॉ. अविनाश आचार्य
२२ भुसावळ- डी. के. चौधरी
२३ वरणगाव- कविवर्य केशवसुत
२४ जामनेर- भवरलाल जैन
२५ मुक्ताईनगर- दगडू राठोड
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.