MPSC Protest Leader: 'राजकारणात जायचं असेल, तर खूप साऱ्या ऑफर...'; एमपीएससी आंदोलनातील 'युवा चेहरा' विवेकानंद पाटीलची राजकीय 'गुगली'

MPSC Protest: विवेकानंद पाटीलला काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आपल्याला फोन आला असल्याची माहिती दिली होती. यावेळी फोनवरुन राज ठाकरेंनी त्याला मुंबईला भेटण्यासाठी बोलावल्याचंही त्यानं सांगितलं. यावेळी त्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विनंतीला मान देत आंदोलनस्थळी हजेरी लावली होती.
Vivekanand Patil | MPSC Protest
Vivekanand Patil | MPSC Protestsarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: पुण्यातील एमपीएससी आंदोलनादरम्यान मांडलेल्या सडेतोड आणि आक्रमक भूमिकांमुळे कोल्हापूरचा विवेकानंद पाटील हा विद्यार्थी चेहरा चांगलाच गाजला होता. त्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसमोर केलेल्या भाषणंही सोशल मीडियावर प्रचंड गाजली होती. त्याच्या भाषणाची दखल घेत त्याला आंदोलनानंतर राज ठाकरेंनी फोन करुन मुंबईलाही भेटायला बोलावलं होतं.त्याच विवेकानंदनं राजकीय पक्षांच्या ऑफरवर मोठा गौप्यस्फोट केला आहे.

विवेकानंद पाटील हे जळगावमध्ये बुधवारी(ता.21 ऑक्टोबर) माध्यमांशी संवाद साधला.मला राजकारणात जाण्याचे कोणतेही वेध लागलेले नाहीत. मी उपरोधिकपणानं आम्हांला नोकऱ्या नाहीत,मग राजकारणात येऊ द्या असं म्हणालो होतो. राजकारणात जायचं असेल तर पक्षाचा प्रवक्ता व्हा, म्हणून खूप साऱ्या ऑफर होत्या ना,इथं एवढ्या लांब आलो असतो?असा सवालही पाटीलने केला.

तसेच राजकीय पक्षांच्या ऑफरबाबत विवेकानंद म्हणाला, मी आंदोलनाच्या ठिकाणीही स्पष्टपणे सांगितलं होतं की, कितीही लाखो रुपये दिले, तरी कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता होणार नाही, राजकारणात काही येणार नाही. मला जे करायचंय ते मी रस्त्यावरती उतरून माझ्या हिमतीवरती करत राहणार असल्याचं विवेकानंद पाटील म्हटलं.

विवेकानंद पाटीलनं राजकारण आणि एमपीएससी हे दोनच मार्ग नसल्याची भूमिकाही मांडली. यावेळी त्यांनी राजकारण, एमपीएससी व्यतिरिक्त जगण्याच्या हजारो वाटा असून त्या फक्त मिळवता आल्या पाहिजेत. वक्तृत्व, कला, क्रीडा,संगीत यांच्यानंतर विविध क्षेत्रंही पादाक्रांत करता येईल अशा खूप साऱ्या गोष्टी असल्याचंही पाटीलनं म्हटलं.

Vivekanand Patil | MPSC Protest
Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या 21 पैकी 12 जागा बिनविरोध; 9 जागांसाठी निवडणूक; दिग्गजांच्या माघारीनंतर कोण बिनविरोध? कोण रिंगणात?

कोणत्याही लढ्याला यश हे पहिल्या दिवशीच मिळालं पाहिजे ,अशातला काही भाग नाही. आम्ही 11 दिवस लढत होतो. त्याच्यानंतर आमच्या लढ्याला यश कुठेतरी थोड्याफार प्रमाणात मिळालं म्हणायला हरकत नाही. एमपीएसीच्या अध्यक्षांचा राजीनामा अजूनही झालेला नाही, संवैधानिक मार्ग आम्ही अवलंबलेला असल्याचं विवेकानंदनं सांगितलं.

कॉक्रोच जनता पार्टी सध्या ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मागताहेत,त्यांची मागणी वेगळी आहे आणि आमची मागणी वेगळी आहे. त्यामुळे दोन लढाया वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांचं तात्विक बैठक वेगळी आहे. आमची तात्विक बैठक वेगळी होती, त्यामुळे आमचं कार्यक्षेत्र सध्या महाराष्ट्र आहे, त्यांचं देश असल्याचंही पाटीलनं स्पष्ट केलं.

Vivekanand Patil | MPSC Protest
Raj Thackeray: देशात राजकीय भूकंप होणार? राहुल गांधी, संजय राऊतांनंतर आता राज ठाकरेही म्हणाले, "पुढच्या पाच महिन्यात..."

राज ठाकरेंचा फोन...

विवेकानंद पाटीलला काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आपल्याला फोन आला असल्याची माहिती दिली होती. यावेळी फोनवरुन राज ठाकरेंनी त्याला मुंबईला भेटण्यासाठी बोलावल्याचंही त्यानं सांगितलं. यावेळी त्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या विनंतीला मान देत आंदोलनस्थळी हजेरी लावली होती.

आंदोलनातील युवा चेहरा पाटीलनं राज ठाकरेंचा नुकताच फोन येऊन गेला. तुमच्या लढ्याला यश मिळालं. आता मुंबईला येऊन भेटून जा, असा निरोप दिला असल्याची माहिती दिली. यावेळी त्यानं आपण राज ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच पुण्यातील आंदोलनानंतर राधानगरी तालुक्यातील त्याच्या मूळ गावी ग्रामस्थांकडून विवेकानंदचं जंगी स्वागत करण्यात आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com