Fake FDA Officer Extortion Case : अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सध्या राज्यभरात धडक कारवाया सुरु आहेत. हॉटेल, ढाबे, डेअरी आणि उत्पादन कंपन्यांमध्ये छापेमारी केली जात आहे. मुंढे यांच्या याच कारवाईचा धसका भेसळमाफियांसह ग्रामीण भागातील सामान्य लोकांनीही घेतल्याचे सध्याचे चित्र आहे. याचाच गैरफायदा भिवंडीमध्ये तोतया महिलांच्या टोळी घेतला हे. या महिलांकडून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून व्यापऱ्यांना धमकावून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
भिवंडीमध्ये मागील पंधरा दिवसांपासून भिवंडीतील शांतीनगर परिसरातील हॉटेल्स आणि किरकोळ विक्रेत्यांना ही टोळी लक्ष्य करत होती. ही टोळी स्वतःला FDA अधिकारी असल्याचे भासवत शिळे, अस्वच्छ अन्न विक्री तसेच मुदतबाह्य माल विक्रीचे आरोप करत व्यापऱ्यांना धमकावत होती आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करत होती.
दरम्यान या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका महिलेला ताब्यात घेतले असून पोलिस येण्यापूर्वीच दोन महिला आणि एक पुरुष घटनास्थळांवरून पसार झाले. तर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात असल्याचे समोर आले आहे. या घटेमुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान समशाद खान आणि जावेद मोहम्मद चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भिवंडीतील शांतीनगर परिसरात उच्छाद घालणाऱ्या टोळीचा पर्दाफार्श केला. येथे तातडीने कारवाई करत घटनास्थळांवर जाऊन कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांना नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका महिलेला पकडण्यास यश आले आहे. तर या महिलेचे नाव शांताबाई दशरथ राजपूत असे आहे.
तर तिच्याकडे केलेल्या चौकशीत आणखी दोघांचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी तिच्यासह अन्य तीन साथीदारांविरोधात खंडणी उकळणे आणि तोतया अधिकारी बनून धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर अटक करण्यात आलेल्या शांताबाई राजपूत हिला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यावेळी शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी, कोणतीही अधिकृत तपासणी असल्यास संबंधित व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांची ओळख पटवूनच सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.