Crop Loan Burden : शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे आभाळ कोसळलं आहे. खरीपाचे अख्खे पीक वाया गेले आहे. त्यामुळे कर्ज कसं फेडायचं, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. त्यात संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेचे कर्ज फेडू शकत नाही, या चिंतेतून शेतकरी दाम्पत्याने जीवन संपवलं आहे. या दाम्पत्याचे पश्चात दोन लहान मुले आहेत.
कर्ज आणि आर्थिक संकटामुळे फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील पिंपरी शिवारात शुक्रवारी रमाबाई विलास जमखडे यांनी विहिर उडू घेतली. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी विलास जमधडे यांनी गळफास घेत जीवन संपवले. त्यांनी चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे.
चिठ्ठीमध्ये लिहिले आहे की, माझ्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पीक कर्ज आहे. मी विलास गळफास घेत आहे. माझ्या बायकोने देखील काल पीककर्जामुळे जीवन संपवलं. सुमित आणि अमित मला माफ करा. माझी शेवटची इच्छा म्हणून आळंद येथे राहूनच तुम्ही पुढील शिक्षण पूर्ण करा.
जमधडे दाम्पत्याच्या या टोकाच्या निर्णयाने गावकऱ्यांना धक्का बसला आहे. त्यांची चिठ्ठी वाचून गावकरी भावूक झाले. आपल्या दोन्ही मुलांनी शिक्षण घ्यावे, अशी इच्छा विलास यांनी व्यक्त केली आहे. मात्र, आई वडिलांच्या मृत्यूने सुमित-अमितचे भविष्य अंधारात गेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.