Farmer Loan Waiver Sarkarnama
महाराष्ट्र

Farmer Loan Waiver: कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर; 3.55 लाख शेतकरी पात्र, पैसे मिळवण्यासाठी ‘हे’ काम करा!

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर; राज्यातील ३.५५ लाख शेतकरी पात्र, पुण्यातील ६६४८ शेतकऱ्यांचा समावेश. आधार प्रमाणीकरणानंतर रक्कम जमा होणार.

Mangesh Mahale

Pune News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्यातील ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील ६ हजार ६४८ शेतकरी या यादीत आहेत.

या कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून राबविली जात आहे. ‘महाआयटी’च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची माहिती तपासून यादी तयार केली जात आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५पर्यंत थकीत असलेली पीक कर्जे या योजनेत विचारात घेतली जात आहेत. तसेच ३१ मार्च २०२६पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे, पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येत आहे.

पहिल्या यादीतील १२.५८ लाख शेतकऱ्यांना लाभ

बँकांनी ‘महाआयटी’च्या पोर्टलवर या योजनेसाठी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर संगणकीय प्रक्रियेतून १६.९६ लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी तयार करण्यात आली. ही यादी २४ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात आली होती.

पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १२.५८ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १० हजार ११४.९० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये ७ ऑगस्ट रोजी ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५०२८.६० कोटी रुपये, तर २४ ऑगस्ट रोजी ६.३६ लाख शेतकऱ्यांना ५०८६.३० कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

आधार प्रमाणीकरण आवश्यक

दुसऱ्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या कर्जखात्यातील थकबाकीची खातरजमा करावी. त्यानंतर जवळच्या आपले सेवा केंद्रा’त जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या संबंधित कर्जखात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT