Pimpri Police : ‘मा. आमदार, महाराष्ट्र राज्य’ स्टिकर लावून फिरत होता; पोलिसांनी गाडी थांबवताच सगळा तोरा उतरला!

Pimpri Chinchwad Police fake MLA sticker: फॉर्च्युनरवर ‘मा. आमदार, महाराष्ट्र राज्य’चा अनधिकृत स्टिकर आणि काळ्या काचा; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करत बनावट रुबाब उतरवला.
Pimpri Chinchwad Police fake MLA sticker
Pimpri Chinchwad Police fake MLA stickerSarkarnama
Published on
Updated on

Pune News: गाडीच्या काचेवर 'आमदार' असा दिमाखात स्टिकर लावायचा, गडद काळ्या काचा लावून रस्त्यावरून तोऱ्यात फिरायचं आणि टोलनाक्यापासून ते व्हीआयपी पासपर्यंत सगळे फायदे लाटायचे... अगदी आपणच भागाचे लोकप्रतिनिधी असल्याच्या थाटात मिरवणाऱ्या एका व्यक्तीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चांगलाच 'करेक्ट कार्यक्रम' केला आहे!

आमदार झाल्याचा आव आणत रस्त्यावर रुबाब दाखवणाऱ्या दोन वेगवेगळ्या कारचालकांवर वाहतूक पोलिसांनी गुन्हे दाखल करत त्यांचा सगळा नखरा एका मिनिटात उतरवला आहे.

नाशिक फाट्यावर पोलिसांनी लावळा ट्रॅप

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश देशमुख, दापोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार आणि वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक फाटा येथे विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत होती.

सायंकाळी चार ते सहाच्या सुमारास संशयित वाहनांची तपासणी सुरू असतानाच, काळ्या काचा असलेली एक आलिशान फॉर्च्युनर गाडी पोलिसांच्या दिशेने येताना दिसली. पोलिसांनी गाडी अडवून पाहणी केली असता, गाडीच्या पुढील व मागील काचेवर कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना 'मा. आमदार, विधानसभा, महाराष्ट्र राज्य' असा बनावट लोगो लावला असल्याचे उघडकीस आले.

Pimpri Chinchwad Police fake MLA sticker
Gokul Election : 1400 संस्थांच्या पात्रतेनंतर ‘गोकुळ’मध्ये नवे राजकीय गणित; मुश्रीफांचा भाजपला इशारा?

टोल वाचवणे, व्हीआयपी सवलतींसाठी स्टिकरचा खेळ

खाकी गणवेशातील पोलिसांनी पोलिसी दणका दाखवत विचारपूस सुरू केली, तेव्हा समोर आलेला प्रकार पाहून पोलीसही अवाक झाले. रस्त्यावरून जाताना पोलिसांचा धाक राहू नये, टोलनाक्यावर कर वाचवावा आणि कुठेही व्हीआयपी सवलत मिळवून समाजात रोखठोक प्रभाव पाडता यावा, याच हेतूने हा बनावट 'आमदारकीचा' स्टिकर लावल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Pimpri Chinchwad Police fake MLA sticker
Madanlal Bafna Passes Away: काँग्रेसचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री मदनलाल बाफना यांचे निधन

यांच्यावर झाली कारवाई

या प्रकरणी भोसरी व दापोडी वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई सुरेश शिंदे यांच्या तक्रारीवरून कृष्णा गोविंद अंबर (वय २६, रा. मोशी) आणि मालती महादेव चव्हाण (रा. भोसरी) यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आला आहे.

दुसरीकडे, वाकड परिसरातील कारवाईत हिंजवडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस फौजदार मेराज सौदागर यांच्या फिर्यादीवरून नईम इसहाक शेख (वय ५०, रा. मोहननगर, चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या गाडीवरही असाच अनधिकृत लोगो आढळून आला. या प्रकरणांचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रोळके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हेत्रे करत आहेत.

Pimpri Chinchwad Police fake MLA sticker
PF News: तुमच्या PF खात्यात किती पैसे आहेत? WhatsApp वर फक्त ‘Hello’ पाठवा अन् लगेच जाणून घ्या!

पोलिसांचा कडक इशारा

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे आमदार, खासदार, पोलीस, प्रेस किंवा विविध सरकारी पदांचे स्टिकर व लोगो लावून फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाहनांवर व चालकांवर यापुढेही थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम वाहतूक पोलिसांनी दिला आहे. तूर्तास, आमदारांसारखा रुबाब दाखवायला गेलेल्या या महाभागांना आता पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com