PF News: तुमच्या PF खात्यात किती पैसे आहेत? WhatsApp वर फक्त ‘Hello’ पाठवा अन् लगेच जाणून घ्या!

EPFO WhatsApp service: EPFO ची WhatsApp सेवा वापरण्यासाठी प्रथम अधिकृत WhatsApp चॅनेलशी जोडावे लागेल. यासाठी EPFO ने दिलेला QR कोड स्कॅन करता येईल.
EPFO WhatsApp service
EPFO WhatsApp serviceSarkarnama
Published on
Updated on

WhatsApp PF Balance : PF खात्याशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आता EPFO सदस्यांना कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) WhatsApp आधारित सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून PF बॅलन्स, मागील पाच व्यवहार तसेच क्लेमची सद्यस्थिती तपासता येणार आहे.

EPFO ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून या सुविधेबाबत माहिती दिली आहे. डिजिटल माध्यमातून सदस्यांना त्यांच्या PF खात्याशी संबंधित आवश्यक माहिती सहज उपलब्ध करून देणे, हा या सेवेचा उद्देश आहे.

WhatsApp वरून सेवा कशी वापरायची?

EPFO ची WhatsApp सेवा वापरण्यासाठी प्रथम अधिकृत WhatsApp चॅनेलशी जोडावे लागेल. यासाठी EPFO ने दिलेला QR कोड स्कॅन करता येईल. त्याचबरोबर अधिकृत WhatsApp चॅनेलच्या लिंकद्वारेही ही सेवा सुरू करता येते.

चॅनेलवर गेल्यानंतर सदस्याने ‘Hello’ असा संदेश पाठवायचा आहे. मात्र, ही सुविधा वापरण्यापूर्वी मोबाइल क्रमांकाची पडताळणी केली जाणार आहे.

UANशी जोडलेला नंबर असणे आवश्यक

WhatsApp वरून आलेला ‘Hello’ संदेश संबंधित सदस्याच्या UAN (Universal Account Number) शी नोंदणीकृत असलेल्या मोबाइल क्रमांकावरूनच आला आहे का, हे EPFO तपासणार आहे.

EPFO WhatsApp service
School Leaving Certificate Correction: शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार! न्यायालयाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सदस्याला आपल्या पसंतीच्या स्थानिक भाषेत मेन्यू पर्याय दिसतील. त्यामधून आवश्यक सेवा निवडून PF खात्याची संबंधित माहिती मिळवता येईल.

चॅटबॉटकडूनही मिळणार उत्तरे

या WhatsApp सुविधेत काही प्रश्नांची उत्तरे थेट चॅटबॉटच्या माध्यमातून मिळतील. त्याशिवाय आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी EPFO च्या डेटाबेसचाही वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे PF खात्याशी संबंधित प्राथमिक माहिती मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

EPFO WhatsApp service
Teacher News: अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रलंबित प्रस्तावांना वेग; 21 सप्टेंबरपर्यंत डेडलाइन

कोणती माहिती मिळणार?

1. PF Balance: खात्यात जमा असलेली PF शिल्लक रक्कम तपासता येईल.

2. मागील पाच व्यवहार: PF खात्यात झालेले शेवटचे पाच व्यवहार पाहता येतील.

3. Claim Status: EPFO कडे केलेल्या क्लेमची सद्यस्थिती WhatsApp वरून समजून घेता येईल.

4. स्थानिक भाषेतील सुविधा: पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध मेन्यूमधून स्थानिक भाषा निवडून सेवा वापरता येईल.

EPFO WhatsApp service
8th Pay Commission: ₹22,450 पेन्शन थेट ₹57,697 होणार? चर्चेतील आकड्यामागचं खरं गणित समजून घ्या

EPFO ची ही सुविधा सुरू झाल्यामुळे सदस्यांना PF खात्याची प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा आधार घेण्याची गरज कमी होणार आहे. WhatsApp सारख्या सहज उपलब्ध असलेल्या माध्यमातून आवश्यक माहिती मिळत असल्याने सदस्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com