Anil Desai Sarkarnama
महाराष्ट्र

Anil Desai News : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनिल देसाईंना बजावले समन्स; 'हे' आहे कारण

Political News : शिवसेना पक्षाच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

Sachin Waghmare

Shivsena News : शिवसेना पक्षाच्या खात्यातून ५० कोटी पक्ष निधी काढल्याप्रकरणी ५ मार्चला ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई यांची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनिल देसाई यांना समन्स बजावण्यात आले आहे.

शिवसेना पक्षाच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

शिवसेना पक्षाच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी पुढे आला होता. त्यानंतर शिवसेना पक्षाच्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली होती.

या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते माजी खासदार अनिल देसाई यांची चौकशी ५ मार्चला करण्यात येणार आहे. या चौकशीला ते जाणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान “ निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष आम्हाला दिला. त्यानंतर एक पत्र आलं. शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये आम्हाला द्यावेत. ते आम्हाला हवे आहेत, असे त्या पत्रात नमूद होते. मला आशिष कुलकर्णी आणि सचिनने याबाबत अधिक माहिती दिली. मी एका क्षणाचाही विलंब लावला नाही. त्यांना बाळासाहेब नकोत. बाळासाहेबांचे विचार नकोत. मी ते ५० कोटी रुपये तातडीने त्यांना द्या असे म्हणालो, असे मुख्यमंत्री शिंदेंनी सभेप्रसंगी सांगितले होते.

त्यानंतर शिवसेनेच्या खात्यावरील ५० कोटी रुपये तातडीने त्यांना देण्यात आले. ते आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करतात, मग आम्हाला ५० खोके मागताना त्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती,” अशी खोचक टीका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली होती.

R

SCROLL FOR NEXT