Devendra Fadnavis News, Praveen Darekar News
Devendra Fadnavis News, Praveen Darekar News Sarkarnama
महाराष्ट्र

दरेकरांवर गुन्हा : बचावासाठी फडणवीसांनी दाखवले राष्ट्रवादीच्या नेत्याकडे बोट

सरकारनामा ब्युरो

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर (Pravin Darekar) यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणूक फसवणुक प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबै बँकेसाठी प्रवीण दरेकर यापूर्वी मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. यावेळी देखील त्यांनी मजूर प्रवर्गातूनच अर्ज भरला होता. मात्र यंदा त्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. (Praveen Darekar News)

प्रविण दरेकर यांना या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीसही बजावली होती. 'या नोटिशमध्ये 'आपण मजूर आहात की नाही,' अशी विचारणा करण्यात आली होती. चौकशीनंतर यापूर्वीच मजूर नसल्याचे सांगत दरकेर यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे.

दरम्यान दरेकर यांच्यावर दाखल झालेल्या या गुन्ह्याचे पडसाद आज विधानसभेत देखील उमटले. आज विधानसभेत बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी कालच सांगितले होते, सरकार आता प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा कट करत आहे. दरेक मजूर संस्थेचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पण या महाराष्ट्रातील कोणतीही मजूर संस्था काढा, अर्धे आमदार आहेत आणि ते सर्वपक्षीय आहेत. सगळ्या पक्षांचे आमदार मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत. आपण कोणत्याही बँकेत मजूर संस्थेतून निवडून आलेले बघा ते कोणत्या तरी पक्षाचे नेते आहेत.

मागील वेळी आम्ही ही गोष्ट बोललो तेव्हा हे खुद्द अजित पवारांनी देखील मान्य केले होते. मात्र त्यानंतर देखील सुडाच्या भावनेने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही न्यायालयात जावू, आमचा आवाज बुलंद राहिल. विरोधी पक्षनेत्यावर अशाप्रकराची कारवाई, आधी असं कधीच घडलं नव्हतं, असे फडणवीस म्हणाले.

याशिवाय आजपासून आम्ही सरकारला प्रत्येक ठिकाणचे मजूर संस्थांचे अध्यक्ष कोण आहेत. त्याची यादी देऊ. कोणावर गुन्हा दाखल करणार, हे पाहू. जर तसे झाले नाही तर सरकारविरोधात न्यायालयात जाऊ. सरकारने याबाबत आम्हाला माहिती द्यावी, तो आमचा अधिकार आहे, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, गुलाबराव देवकर आजही जळगावमध्ये मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत, याकडेही लक्ष वेधले. यावर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी गृहमंत्री उत्तर देतील असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT