Maharshtra Vidhansabha  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Legislative Council : विरोधकांची तोफ थंडावणार? हिवाळी अधिवेशनापूर्वीच 'या' 5 अनुभवी आमदारांना विधानपरिषदेतून निरोप!

MLC election News : या पाच आमदारांच्या आमदारकीची मुदत 6 डिसेंबरला संपणार आहे. तर हिवाळी अधिवेशनाची सुरुवात नागपूरमध्ये 7 डिसेंबरपासून होणार आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. त्याच दिवशी विधान परिषदेतील पाच अनुभवी सदस्यांचा कार्यकाळ संपणार असल्याने सभागृहात निरोप देण्यात आला. या पाच आमदारांच्या आमदारकीची मुदत 6 डिसेंबरला संपणार आहे. तर हिवाळी अधिवेशनाची सुरुवात नागपूरमध्ये 7 डिसेंबरपासून होणार आहे. त्यामुळे लवकरच रिक्त होत असलेल्या या विधानपरिषदेच्या पाच जागेसाठी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेच्या विरोधी बाकांवरील ५ अनुभवी सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सभागृहाने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या पाच आमदारात छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा समावेश आहे.

त्यासोबतच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील किरण सरनाईक या पाच जणांच्या आमदारकीची मुदत लवकरच संपणार आहे. या पाच आमदारांनी विधानपरिषदेत शिक्षण, सहकार, शेती आणि सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली होती.

या पाच सदस्यांच्या कार्यकाळ 6 डिसेंबरला संपणार आहे. तर हिवाळी अधिवेशनाची सुरुवात नागपूरमध्ये 7 डिसेंबरपासून होणार आहे. त्यापूर्वी या पाच आमदारांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यासोबतच विधिमंडळात या पाच जणांना निरोप देण्यात आला.

विधानपरिषदेच्या या पाच जागेसाठी आता लवकरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. या साठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. नोव्हेंबर महिन्यात या पाच जागेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT